ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
मुंबई इंडियन संघाने आयपीएल 2024 या हंगामासाठी आपला नवा कर्णधार नियुक्त केला आहे रोहित शर्माच्या जागेवर हार्दिक पांड्या आता संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्स ने कर्णधार बदलल्याची घोषणा करताच क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजीचा सूर पसरला. अनेक जणांनी ट्विटरवर मुंबई इंडियन्सला अन फॉलो करण्यास सुरुवात केली. मुंबई इंडियन्स ने क्रिकेट प्रेमींच्या भावनेचा विचार न करताआपल्या निर्णयावर ठाम राहिले.
हार्दिक पांड्या यापूर्वी मुंबई इंडियन संघाचा सदस्य होता. मात्र गुजरात टायटन्सचा आयपीएल मध्ये समावेश झाल्यानंतर तो त्या संघाचा कर्णधार झाला. 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघाला त्याने विजेतेपद जिंकून दिले. त्यानंतर मागील वर्षी 2023 मध्ये त्यांनी आपल्या संघाला आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. अंतिम सामन्यात सीएसके ने गुजरातचा पराभव केला होता. त्याची हीच कामगिरी लक्षात घेता मुंबई इंडियन्स ने त्याच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.
रोहित शर्मा हा गेल्या दहा वर्षापासून मुंबई इंडियन संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळतोय. त्याने नेतृत्वाला सजेशन अशी कामगिरी देखील करून दिली गेल्या दहा वर्षात त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे. 2013 2015 2017 2019 आणि 2020 मध्ये त्यांनी आयपीएल चषकावर सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले होते.
मुंबई इंडियन्स या नव्या सेनापतीचे शिक्षण किती झाले आहे याची माहिती घेतली असता तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल. टाईप्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याचे शिक्षण अवघे आठवी पास आहे. क्रिकेटमधील लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने शिक्षणाला सोडचिट्टी दिली.
हार्दिक पांड्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कारकीर्द ही जबरदस्त राहिली असली तरी तो फिटनेसमुळे बऱ्याच वेळा बेंचवर बसून राहिला आहे. भारतात झालेल्या 2023 विश्वचषक स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो अंतिम सामन्यात खेळू शकला नाही. परिणामी अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.
मध्यंतरी भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याने त्याच्या फिटनेस वरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. भारतीय संघाकडून खेळताना हार्दिक पांड्या फिट राहतो. मात्र तो आयपीएलच्या वेळेस फिट कसा राहतो? असा प्रश्नचिन्ह त्याने उपस्थित केल्यानंतर एकच खळबळ माजली होती. फिटनेसमुळे बाहेर पडल्यानंतर बंड्याने स्थानिक क्रिकेटमध्ये देखील खेळले नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयने आपल्या करारामधून वगळले होते.
हार्दिक पांड्या देखील स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास जास्त स्वारस्य दाखवत नाही. तरीपण बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर कोणतीच कारवाई केली नाही. कारवाईत बीसीसीआयवर दुजाभाव केल्याची टीका देखील झाली होती. आक्रमक फटकेबाजी आणि महत्त्वाच्या परिस्थितीत संघाला गोलंदाजीत मदत करण्याची खुबी असलेल्या या गोलंदाजावर देखील बीसीसीआय कधी पण कारवाई करू शकते.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.