मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुमची चर्चा उघड, नवा कर्णधार हार्दिक पांड्याबाबत मुंबई इंडियन्स खेळाडूंचा मोठा खुलासा, वाचा सविस्तर.

0
2
हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या

 

यंदा आयपीएल च्या 17 व्या हंगामात आपल्याला अनेक खेळाडू तसेच अनेक संघात मोठ्या प्रमाणात बदल झाले दिसून आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आयपीएल चा सर्वात मोठा फायदा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर झालेला आहे त्याचबरोबर देशातील युवा खेळाडूंना संधी मिळत आहेत.

 

हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या

 

आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू डेव्हिडने ‘अभूतपूर्व’ कर्णधार हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे आणि म्हंटले आहे हार्दिक पांड्या सारखी फलंदाजी कोणताच खेळाडू करू शकत नाही शिवाय डेड ओव्हर मध्ये हार्दिक पांड्या आक्रमक खेळी करण्यासाठी स्वतः परवानगी देतो.

हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या

 

आतापर्यंत हार्दिक पांड्या ने वेगवेगळ्या पोझिशनवर फलंदाजी करत चार मॅचमध्ये 138.46 च्या स्ट्राइक रेटने 108 धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, या काळात मधल्या आणि खालच्या फळीत आक्रमक खेळी खेळण्यात तो अपयशी ठरला आहे. या आधी गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पांड्याने कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना चार चेंडूत 11 धावा केल्या होत्या.

 

 

शिवाय हैदराबादमध्ये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या ने 20 चेंडूत केवळ 24 धावा केल्या. हार्दिक पांड्या ने राजस्थान रॉयल्सविरुद्ध कठीण परिस्थितीत 21 चेंडूंत 34 धावा केल्या, तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या उच्च धावसंख्येच्या सामन्यात त्याने 33 चेंडूंत 39 धावांची संथ खेळी केली.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला डेव्हिड म्हणाला, ‘आम्ही यावर चर्चा केली आहे. हार्दिक आमच्या संघात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात आम्ही मधल्या षटकांमध्ये संघर्ष करत होतो, पण हार्दिकने आमच्यासाठी शानदार खेळी खेळली होती अत्यंत आक्रमक फलंदाजी करत बाकी खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा उत्कृष्ठ कर्णधार समजला जातो.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here