मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जी याने दोनच दिवसात मोडला मयंक यादव चा मोठा विक्रम

0
3
== आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved. IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जी याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2024 मधील सामन्यात त्याला केवळ तीन बळी मिळवता आले. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सोमवारी झालेल्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नसला तरी आयपीएलच्या इतिहासामध्ये त्याचे नाव कोरले गेले आहे. गेराल्ड कोएट्जी याने मयंक यादव याला पाठीमागे टाकत आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला.

 

लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने दोन दिवसांपूर्वी पंजाब किंग्जविरुद्धच्या पदार्पणात 155.8 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. हा चेंडू पाहून पंजाबचा कर्णधार शिखर धवन देखील अचंबित झाला होता. चार षटकात त्याने 19 चेंडू दीडशेहून अधिकच्या स्पीडने चेंडू टाकत होता. त्याने 27 धावा देऊन तीन विकेट घेतले.

 

 

कोएट्जी सोमवारी मंयकचा हा विक्रम तोडला. त्याने राजस्थान विरुद्ध 157.4 च्या स्पीडने चेंडू फेकला होता. राजस्थानच्या डावातील शेवटचा चेंडू 157 च्या स्पीडने फेकला होता. रियान पराग याने या चेंडूचा सामना केला. चेंडू रियान परागच्या बॅटचा कट लागून यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून तो सीमारेषा पार केला.

 

आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध च्या सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रम केला नसून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो समाविष्ट झाला आहे. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रम शॉन टेट च्या नावावर आहे. त्याने 13 वर्षांपूर्वी हा विक्रम केला होता. हा विक्रम मोडण्याची त्याला संधी होती, मात्र थोडक्यात हुकला.

ऑस्ट्रेलियाच्या या माजी खेळाडूंने आयपीएल 2011 मध्ये 157.71 च्या स्पीडने गोलंदाजी केली होती.

 

2023 मध्ये भारतात झालेल्या वनडे विश्वचषकातील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याला आयपीएल मध्ये खरेदी करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने 20 गडी बाद केले होते. सर्वाधिक विकेट घेणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला.

 

आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

 

शॉन टेट- 157.71 KMPH- 2011

 

गेराल्ड कोएत्झी- 157.4 KMPH-2024

 

लॉकी फर्ग्युसन- 157.3 KMPH- 2022

 

उमरान मलिक- 157 KMPH – 2022

 

एनरिक नॉर्खिया- 156.22 KMPH-2020

 

 

 

IPL 2024 चा सर्वात वेगवान चेंडू

गेराल्ड कोएत्झी- 157.4 KMPH- MI वि RR

मयंक यादव- 155.8 KMPH- LSG विरुद्ध PBKS

मयंक यादव- 153.9 KMPH- LSG विरुद्ध PBKS

मयंक यादव- 153.4 KMPH- LSG विरुद्ध PBKS

नांद्रे बर्गर- 153 KMPH- RR विरुद्ध DC

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here