दिलशान मधुशंकाच्या जागेवर मुंबई इंडियंस ने दक्षिण आफ्रिकेच्या 17 वर्षीय शाळकरी मुलाला दिली संघात एन्ट्री, गोलंदाजीचा व्हिडीओ तुफान व्हायरल..

0
1
दिलशान मधुशंकाच्या जागेवर मुंबई इंडियंस ने दक्षिण आफ्रिकेच्या 17 वर्षीय शाळकरी मुलाला दिली संघात एन्ट्री, गोलंदाजीचा व्हिडीओ तुफान व्हायरल..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Mumbai Indians Squad for IPL 2024:  मुंबई इंडियंस संघातील प्रमुख गोलंदाज श्रीलंकेचा दिलशान मधुशंका हा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियंस (MUMBAI INDIANS) ने त्याच्या जागी एका शाळकरी मुलाची निवड केली आहे. 19 वर्षाखालील विश्वचषकात वंडर बॉय म्हणून चमकलेला दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज याला आयपीएल मध्ये एन्ट्री मिळाली आहे. तो आता पहिल्यांदा t20 लीग मध्ये आपल्या वेगवान धारदार गोलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी दिसून येईल.क्वेना मफाका (Kwena Maphaka) असं या सतरा वर्षीय गोलंदाजाचे नाव आहे.

Kwena Maphaka : क्वेना मफाका में क्या है ऐसा खास, जो ऑक्शन लिस्ट आते ही होने लगी चर्चा - News Nation

दिलशान मधुशंकाच्या जागी क्वेना मफाका मुंबई इंडियंस  संघात दाखल.

क्वेना मफाका (Kwena Maphaka) हा दिलशान मधुशंकाच्या जागी संघात खेळेल. नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषकात तो धारदार गोलंदाजी करून फलंदाजासाठी काळ बनवून राहिला होता. दक्षिण आफ्रिकेचा हा युवा वेगवान गोलंदाज हुबेहूब कंगीसो रबाडासारखा दिसतो. त्यामुळे मफाका याला बेबी रबाडा देखील म्हटले जाते. 8 एप्रिल 2006 मध्ये जोहनसबर्ग येथे जन्मलेल्या मफाका सेंट स्टिथियंस स्कूल मधील फायनल एअर मध्ये शिकतोय. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो घरी जाणार होता तेवढ्यात त्याला मुंबई इंडियन्स कडून कॉल आला आणि आयपीएल मध्ये त्याची एन्ट्री झाली.

श्रीलंकेचा 23 वर्षीय वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका हा नुकतेच बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल मध्ये 4.6 कोटी मध्ये खरेदी केले होते. आता त्याच्यात जागेवर मफाका खेळणार आहे. मफाकाने आत्तापर्यंत कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळांना खेळला नाही. 17 वर्षाच्या या वेगवान गोलंदाजाने 19 वर्षाखालील विश्वचषकात तब्बल 21 विकेट घेत स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज ठरला.

क्वेना मफाका खतरनाक यॉर्कर चेंडू फेकण्यामध्ये माहीर आहे. विश्वचषक स्पर्धेत त्याने तीन वेळा पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. आयपीएल 2024 च्या ऑप्शन मधला तो सर्वात युवा खेळाडू होता. आयपीएलमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली तर, तो सर्वात युवा खेळाडू ठरेल. मफाका दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षाखालील संघात तसेच दक्षिण आफ्रिका आणि साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी लीग मधील पर्ल रॉयल्स संघाकडून क्रिकेट खेळला आहे.

दिलशान मधुशंकाच्या जागेवर मुंबई इंडियंस ने दक्षिण आफ्रिकेच्या 17 वर्षीय शाळकरी मुलाला दिली संघात एन्ट्री, गोलंदाजीचा व्हिडीओ तुफान व्हायरल..

मफाकाने दक्षिण आफ्रिकेकडून दोन फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत, ज्यात सात विकेट घेतले आहेत तसेच लिस्ट ए च्या दोन सामन्यात त्याच्या नावावर तीन विकेटची नोंद आहे तर नऊ T20 सामन्यात त्याने तेरा विकेट घेण्यात त्याला यश मिळाले. मुंबई इंडियनच्या अंतिम 11 जणांच्या संघात त्याला खेळण्याची संधी मिळाली तर, तो गोलंदाज प्रशिक्षक लसित मलिंगा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जसप्रीत बुमराह याच्या सोबतीत राहून आपली गोलंदाजी अधिक परिपक्व करू शकतो.

IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहल वढेरा,जेसन बेहरेनडॉर्फ, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, क्वेना माफाका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर,शम्स मुलानी, विष्णू विनोद, विष्णू चावला, डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here