IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

0

 

गेल्या 17 वर्षापासून आपल्या देशात आयपीएल चे सामने होत आहेत. आयपीएल चा फायदा आपल्या देशातील युवा खेळाडूंना तसेच आंतररा्ट्रीय क्रिकेट ला सुद्धा झाला आहे. त्यामुळे आपल्या देशात अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट साठी तयार होत आहेत. यंदा येणाऱ्या 22 मार्च पासून आयपीएल ला सुरूवात होणार आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात मुंबई इंडियन्स संघात बदल झालेला आहे या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. आयपीएल T20 मध्ये चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ यशस्वी संघ म्हणून ओळखले जातात. सर्वाधिक विजेतेपद या दोन्ही संघांनी पटकावले आहे.

 

 

मुंबई इंडियन्स 2024 संघ:-

2024 च्या आयपीएल मध्ये सामने चालू होण्याच्या आधीच मुंबई इंडियन्स संघाने संघात मोठा बदल केला आहे. मागील वर्षी जा खेळाडूने मुंबई इंडियन्स या संघाला विजय मिळवून दिला होता त्याच खेळाडूला संघाने यंदा च्या सीजन ला संघाच्या बाहेर बसवले आहे. प्रॅक्टिस दरम्यान दुखापत झाल्यामुळे या वर्षी या खेळाडूला संघाच्या बाहेर ठेवले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने खेळाडूची बदली सुद्धा जाहीर केली आहे.

 

मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल:-

मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आयपीएल 2024 च्या सीजन मधून बाहेर पडला आहे. आयपीएलने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, जेसन बेहरेनडॉर्फ ला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे त्यामुळे त्याला संघात खेळता येणार नाही. मुंबई इंडियन्स या संघाने जेसन बेहरनडॉर्फच्या जागी इंग्लंडच्या ल्यूक वुड या नवीन खेळाडूचा संघात समावेश केला आहे. ल्यूक वुडचा हा पहिलाच आयपीएल चा हंगाम आहे शिवाय मुंबई इंडियन्स या संघाने याला 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे.

 

 

ल्यूक वुड:-

ल्यूक वुडने इंग्लंडकडून आतापर्यंत फक्त 2 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळला आहे. तसेच वूड ला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. तसेच T20 सामन्यात त त्याने 9.66 च्या इकॉनॉमीसह 8 विकेट घेतल्या आहेत. वूड चा हा आयपीएल चा पहिलाच सामना आहे.

 

 

 

 

2024 मधील मुंबई इंडियन्स संघ:-

हार्दिक पांड्या , रोहित शर्मा,सूर्यकुमार यादव,ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, तिलक वर्मा, अर्जुन तेंदुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहल वढेरा, शम्स मुलानी, विष्णु विनोद, पीयूष चावला, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:-IPL T20 : मैदानात धुवाधार षटकारांचा पाऊस पडणारे फलंदाज आहेत तरी कोण, भारतातील या फलंदाजाचा समावेश.

 

 

हे ही वाचा:- आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक जास्त वेळा पराभूत झालेले संघ,RCB आणि मुंबई इंडियन्स या स्थानी.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.