पाकिस्तानच्या विजयानंतर ट्रेंडिंगवर आलेली ‘मिस्ट्री गर्ल’ नक्की कोण होती? या कारणामुळे होतेय सगळीकडे व्हायरल..
पाकिस्तान आणि न्यूझीलंड
यांच्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना खेळला गेला. पाकिस्तानने या सामन्यात 7 विकेट्सने जिंकला. उभय संघांतील हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी या सामन्यात वैयक्तिक अर्धशतके केली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. सामना पाहण्यासाठी मैदानात मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, पण सर्वांचे लक्ष वेधले ते एका सुंदरीने.
उभय संघांतील या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने मर्यादित 20 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य 19.1 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी प्रत्येकी अर्धशतकी खेळी करत 105 धावांची भागीदारी पार पाडली. हा रोमांचक सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या एका चाहतीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. स्टॅन्डमधील तिचे व्हिडिओ आणि फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.
ek toh ye sab dikha ke Williamson jaise bandon ko distract kar diya pic.twitter.com/471DK529zS
— Sunil the Cricketer (@1sInto2s) November 9, 2022
#PakvsNz
Congratulations pakistan on reaching final hoping for India vs Pakistan 😜 #PakvsNz #NZvPAK #INDvsPAK #INDvsENG pic.twitter.com/J1IIqAsfiZ— Anas Choudhary (@choudharyyshab) November 9, 2022
ही चाहती पाकिस्तान
संघाला चीअर करण्यासाठी मैदानात आली होती. स्टॅन्डमध्ये उपस्थित इतर चाहते देखील तिच्याकडे पाहताना दिसत होते. सोशल मीडियाव या चाहतेचाला मिस्ट्री गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळत आहेय. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसते. या व्हिडिओत ती कॅमेऱ्याकडे पाहत फ्लाइंग किस करतानाही दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना तिच्याविषयी जाणून घ्यायचे आहे. मात्र अद्याव तिच्याविषयी कुठली ठोस माहिती मिळालेली दिसत नाही.
Pakistani fans enjoying #pakvsnz #PakistanCricket #inittowinit #IndiaLockdown #T20Iworldcup2022 #T20WorldCup #SemiFinals #BabarAzam𓃵 #ViratKohli pic.twitter.com/PvIheMKQg7
— Donthypeyourself (@Donthypeyourse1) November 9, 2022
दरम्यान, उभय संघांतील
या सामन्याचा एकंदरीत विचार केला, बाबर आणि रिझवानप्रमाणे या सामन्यात न्यूझीलंडसाठी त्यांचा कर्णधार केन विलियन्सन 46, तर डॅरिल मिचेल याने नाबाद 53 धावा केल्या. गोलंदाजी विभागात पाकिस्तानसाठी शाहिन आफ्रिदी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोर्ड दोन विकेट्स घेऊ शकला. या विजयानंतर पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना जिंकणारा संघ रविवारी (13 नोव्हेंबर) अंतिम सामन्यात पाकिस्तानसोबत खेळेल.