अक्षर पटेल – जडेजा आणि मोहम्मद शमी ने कांगारू समोर उभा केला धावांचा डोंगर, आक्रमक फलंदाजी करत वैयक्तिक अर्धशतके.

प्रामुख्याने आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, परंतु हॉकी पेक्षा आपल्या देशात क्रिकेट ला जास्त पसंती आहे. देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे वेडे आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे सर्वाधिक आहे.
नागपूर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी केली आहे . भारतीय संघातील उत्कृष्ठ आणि सर्वगुण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व क्रिकेटपटू आणि आक्रमक फलंदाज रोहित शर्मा ने नागपूर कसोटी मधील दुसऱ्या दिवशी 100 धावा झळकावल्या होत्या. त्यानंतर नागपूर कसोटी मधील तिसऱ्या दिवशी अक्सर पटेल आणि मोहम्मद शमी ने कांगरुला चांगलेच धुवून काढले आहे.
तसेच तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा नंतर अक्सर पटेल आणि रवींद्र जडेजा ने अर्धशतक ठोकत कांगारू समोर धावांचा डोंगर उभा केला आहे. नागपूर कसोटी मधील तिसऱ्या सत्रात रवींद्र जडेजा बाहेर आला त्यानंतर फलंदाजी करायला आला मोहम्मद शमी. मोहम्मद शमी ने सुद्धा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतल. आणि भारतीय संघाचा स्कोर 400 धावांवर पोहचवला.
रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅट मध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय कॅप्टन आहे. परंतु नंतर रोहित शर्मा बाद झाल्यावर ऑस्ट्रेलिया संघाला सावरता आले असते परंतु जडेजा आणि अक्षर पटेल ने सुरुवातीपासून ऑस्ट्रेलिया संघाला झोडपून मारायला सुरुवात केली.
तसेच जडेजा ची विकेट कांगरुला भेटल्यावर मोहम्मद शमी मैदानावर आला. मोहम्मद शमी खेळताना अत्यंत सोपा असा कॅच कांगारू ने सोडल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला चांगलेच महागात पडले कारण तिथूनपुढे मोहम्मद शमी ने आक्रमक फलंदाजी करत संघाचा स्कोर 400 धावांवर पोहचवला.