आयपीएल 2024 मधील आतापर्यंत दहा सामने झाले आहेत. प्रत्येक सामान्यात एक रोमांच पाहायला मिळतोय. देश विदेशातील खेळाडू या लीगमध्ये धमाल करत आहेत. आयपीएल 2024 मध्ये एक असा खेळाडू आहे, ज्याने क्रिकेट मजबुरी म्हणून खेळायला सुरुवात केली होती. आज तोच खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये धमाका करतोय. आयपीएलमध्ये देखील त्याच्या संघासाठी धमाकेदार कामगिरी करतोय. या विदेशी खेळाडूने नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले की, कॉलेजमधील शिक्षण मोफत मिळावे, यासाठी त्याने क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात केली होती.
आयपीएलमध्ये धुमाकूळ घालतोय नांद्रे बर्गर…
दक्षिण आफ्रिकेचा डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा नांद्रे बर्गर याने कॉलेजमध्ये मोफत प्रवेश मिळावा म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. 2014 मध्ये विटवाटर्सरेड युनिव्हर्सिटी मध्ये क्रिकेटसाठी ट्रायल दिली होती, त्यावेळी त्याला स्कॉलरशिप मिळाली होती. एकेकाळी एक एक रुपयासाठी मोहताज असलेला खेळाडू आज करोडो मध्ये खेळतोय. त्याची नेटवर्थ तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आयपीएल 2024 मध्ये नांद्रे बर्गर हा राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व करतोय. त्याच्या धमाकेदार कामगिरीमुळेच राजस्थानचा संघ गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर पोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात 2023 मध्ये केली होती. 28 वर्षाच्या या खेळाडूंने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील सर्व सामने भारताविरुद्ध खेळले आहेत. भारताच्या आफ्रिका दौऱ्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले होते.
भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी 11 बळी घेतले होते. यात रोहित शर्माची महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या नावावर राहिली. तर 3 वनडे सामन्यात 5 बळी घेतले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 138 विकेटची नोंद आहे तर लिस्ट ए च्या सामन्यात 63 आणि t20 मधील 58 सामन्यात 67 विकेट त्याच्या नावे आहेत.
यंदाच्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने नांद्रे बर्गर 50 लाख रुपये देऊन आपल्या संघात सामील करून घेतले होते . आणि आतापर्यंत त्याने पैसा वसूल कामगिरी केली आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.