VIRAL VIDEO: नसीम शहाने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की, न्यूझीलंडच्या या स्टार फलंदाजाला काही कळायच्या आतचं उडाले स्टंप, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये पहिला वनडे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 255 धावा केल्या. पाकिस्तानसाठी नसीम शाहने या सामन्यात 5 विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे. नसीमसमोर न्यूझीलंडचे फलंदाज हतबल दिसत होते.
नसीम शाहने घेतले ५ बळी ..
या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आणि दोन फलंदाजांना झेलबाद केले. नसीमने 10 षटकात 57 धावा देत 5 बळी घेतले आहेत.
Consecutive five-wicket hauls for @iNaseemShah! 🔥#PAKvNZ | #TayyariKiwiHai pic.twitter.com/3UWANjyJWe
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 9, 2023
नसीम शाहने हेन्री शिपलीला तुफानी यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. आऊट झाल्यानंतर फलंदाज खूपच निराश दिसत होता, फलंदाजाची प्रतिक्रिया सांगत होती की त्याला हलण्याची संधीही मिळाली नाही आणि चेंडू स्टंपला लागला. त्याचा हाच व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ..
Crashing the stumps, @iNaseemShah style! 🎯🔥#PAKvNZ | #TayyariKiwiHai pic.twitter.com/G6qYUjiygn
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 9, 2023
न्यूझीलंड – फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (सी), टॉम लॅथम (डब्ल्यू), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन
पाकिस्तान – फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (सी), मोहम्मद रिझवान (प.), हारिस सोहेल, आगा सलमान, मोहम्मद नवाज, उस्मा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ

PAK vs NZ ODI: टीव्हीवर लाइव्ह कसे बघायचे?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व चॅनेलवर तुम्ही टीव्हीवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामना वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकता. सोनी लाइव्ह अॅपवरही सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग केले जाईल.
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: