आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ वेगवान गोलंदाज वर्ल्डकप मधूनही होणार बाहेर..

By | September 16, 2023

आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ वेगवान गोलंदाज वर्ल्डकप मधूनही होणार बाहेर..


आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मधून बाहेर पडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला आणखी मोठा धक्का बसणार आहे कारण संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (naseem shah) आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आशिया चषक स्पर्धेत दुखापत झालेल्या शाहच्या स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे जे ,सुरुवातीच्या परिस्थिती पेक्षा जास्त गंभीर आहे. पीसीबी शाहच्या दुखापतीबाबत पुन्हा एकदा हॉस्पिटल चारची करणार असल्याचे समजते परंतु दुबईत झालेल्या सुरुवातीच्या चाचणीवरून असे दिसते की, या दुखापतीमुळे नसीम पुढील वर्षापर्यंत आणखी क्रिकेट सामने खेळू शकणार नाही.

गोलंदाज

नसीमच्या दुसऱ्य चाचणीचे निकाल पहिल्या चाचणी सारखेच आले तर 20 वर्षीय खेळाडूला मैदानात परतण्यासाठी काही महिने लागू शकतात. याचा अर्थ तो वर्ल्डकप 2023 सह वर्षअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेत तसेच पुढील पाकिस्तान सुपर लीग हंगामात देखील खेळू शकणार नाही. नसीमला ही दुखापत आशिया चषकातील पाकिस्तानच्या सुपर-4 सामन्यात भारताविरुद्धच्या सामन्यात झाली होती, जेव्हा तो 46 वे षटक टाकतांना अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला होता आणि लगेचच तो स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी आली होती. नसीमचा उजवा स्नायू आणि खांद्याच्या खाली दुखापत आहे.

 

विश्वचषकासह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत नसीम शाहची अनुपस्थिती पाकिस्तान संघाला खूप जाणवणार आहे. मात्र नसीमच्या अनुपस्थितीत शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळतील.  5 ऑक्टोबर पासून वर्ल्डकप 2023 ला सुरवात होत आहे.


हेही वाचा:

4 कारणे ज्यामुळे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक ‘राहुल द्रविड’ वर्ल्डकप 2023 नंतर संघाचे प्रशिक्षक पद गमावू शकतो

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *