Nataša Stanković & Hardik Pandya Divorced? आयपीएलमधील सुमार कामगिरी नंतर हार्दिक पंड्याचे वैवाहिक आयुष्य ही संकटात? पत्नी मोठा निणर्य घेण्याच्या तयारीत.

0
22
Nataša Stanković & Hardik Pandya Divorced? आयपीएलमधील सुमार कामगिरी नंतर हार्दिक पंड्याचे वैवाहिक आयुष्य ही संकटात? पत्नी मोठा निणर्य घेण्याच्या तयारीत.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nataša Stanković & Hardik Pandya Divorced? :  IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी लाजिरवाणी होती. संघाने 14 सामने खेळले आणि फक्त 4 जिंकले. हा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दरम्यान, एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याशी संबंधित एका अफवेला जोर आला आहे. Reddit ने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील अंतर वाढले आहे.

Nataša Stanković & Hardik Pandya Divorced? आयपीएलमधील सुमार कामगिरी नंतर हार्दिक पंड्याचे वैवाहिक आयुष्य ही संकटात? पत्नी मोठा निणर्य घेण्याच्या तयारीत.

Nataša Stanković & Hardik Pandya Divorced? :

पोस्टनुसार, “ही केवळ अटकळ आहे, परंतु मागील काही महिन्यांपासून  दोघांनी एकमेकांसोबत कोणतीही स्टोरी पोस्ट केलेली नाही. पूर्वी नताशाच्या इन्स्टाग्रामवर नताशा स्टॅनकोविक पांड्या असायची, पण आता तिने  हार्दिकचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहे. नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या 31 मे 2020 रोजी लग्नबंधनात अडकले होते. IPL 2024 मध्येही नताशा हार्दिकला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर दिसली नाही. दरम्यान, जाणून घेऊया असे कोणते भारतीय क्रिकेटर्स आहेत ज्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे.

याआधी या भारतीय खेळाडूंचे मोडले आहेत लग्न..

विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकचे 2007 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारासोबत 7 फेरे घेतले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर निकिता आणि क्रिकेटर मुरली विजय एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर कार्तिक आणि निकिता 2012 मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे झाले. नंतर यष्टीरक्षक फलंदाजाने स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल हिची जीवनसाथी म्हणून निवड केली.

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द...

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने 1999 मध्ये ज्योत्स्नासोबत लग्न केले. नंतर दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले. अशा परिस्थितीत श्रीनाथने पत्रकार माधवी पत्रावलीशी लग्न केले. क्रिकेटर अरुण लालने वयाच्या ६६ व्या वर्षी दुसरे लग्न केले. त्याने आपला दुसरा जीवनसाथी म्हणून बुलबुल साहाची निवड केली.

 

2022 मध्ये त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. युवराज सिंगचे वडील आणि क्रिकेटर योगराज सिंग यांनीही दुसऱ्यांदा 7 फेऱ्या मारल्या. त्यांनी पहिले लग्न शबनम सिंगशी केले. युवराज सिंग हा शबनमचा मुलगा आहे. योगराजने पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेल (सतवीर कौर) हिच्याशी दुसरे लग्न केले.

Nataša Stanković & Hardik Pandya Divorced? आयपीएलमधील सुमार कामगिरी नंतर हार्दिक पंड्याचे वैवाहिक आयुष्य ही संकटात? पत्नी मोठा निणर्य घेण्याच्या तयारीत.

भारताचा माजी सलामीवीर विनोद कांबळीने 1998 मध्ये हॉटेल रिसेप्शनिस्ट नोएला लुईसशी लग्न केले. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि लवकरच दोघे वेगळे झाले. यानंतर कांबळीने फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटसोबत सात फेऱ्या मारल्या. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने अभिनेत्री संगीता बिजलानीला आपली जीवनसाथी बनवले होते. यासाठी त्याने पहिली पत्नी नौरीनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. नंतर अझहर आणि संगीताही वेगळे झाले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…