आयपीएल मध्ये एका सामन्यात समालोचन करण्यासाठी नवज्योतसिंग सिद्धूंना मिळायची इतकी मोठी रक्कम,आता पुन्हा घुमणार ‘ठोको’चा आवाज..

आयपीएल मध्ये एका सामन्यात समालोचन करण्यासाठी नवज्योतसिंग सिद्धूंना मिळायची इतकी मोठी रक्कम,आता पुन्हा घुमणार 'ठोको' चा आवाज...

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहेत.मात्र आता ते गोलंदाजी अथवा फलंदाजी करणार नाही तर, कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून सामन्याचे समालोचन करणार आहेत. तब्बल एक दशकानंतर ते समालोचकाच्या भूमिकेसाठी सज्ज झाले आहेत.

थेट अचूक आणि बिनधास्त बोलणारे नवज्योत सिंग सिद्धू यांचा ‘छा गये गुरु’ हा डायलॉग आजही फेमस आहे. येत्या 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 च्या स्पर्धेदरम्यान ते कॉमेंट्री करणार आहेत.

अखेर विराट कोहली भारतात दाखल; वाचा विराट कोहली इतके दिवस होता तरी कुठे? पहा व्हायरल व्हिडीओ…

आयपीएल मध्ये कॉमेंट्री करण्यासाठी नवज्योतसिंग सिद्धू किती घ्यायचे फीस?

आयपीएल मध्ये एका सामन्यात कॉमेंट्री करण्यासाठी नवज्योतसिंग सिद्धू तब्बल 25 लाख रुपये घेत होते. आयपीएलच्या सुरुवातीला ते कॉमेंट्री बॉक्स मधील एक्स फॅक्टर होते. आपल्या वेगळ्या शैलीमध्ये ते कॉमेंट्री करून सर्वांची मने जिंकत असत. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर ते कॉमेंट्री करण्यात हीट ठरले. त्यानंतर ते एंटरटेनमेंटच्या दुनियेमध्ये प्रवेश केला. कॉमेडी शो मध्ये ते परीक्षक म्हणून सहभागी झाले. शेरोशायरी च्या माध्यमातून कार्यक्रमात संवाद साधायचे. यासाठी जबरदस्त फी देखील घ्यायचे.

सिद्धू म्हणाले की,

समालोचन करताना मला नेहमी अस्वस्थ वाटायचे. मी हे काम करेल की नाही हा आत्मविश्वास माझ्याकडे नव्हता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मी समालोचन करेल असे मला वाटले नव्हते. आयपीएल मधील एका सामन्याचे समालोचन करण्यासाठी 25 लाख रुपये घ्यायचो. पूर्ण स्पर्धेमध्ये मला 60 ते 70 लाख रुपये मिळायचे. पण पैशांमधून समाधान मला मिळत नव्हते, तर आनंद या गोष्टीचा होता की वेळ पटापट निघून जायची, यात खरा आनंद होता.

क्रिकेट कॉमेंट्री पासून दूर राहिलेल्या सिद्धू हे वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले होते. 2019 मध्ये ‘द कपिल शर्मा शो’ मधून ते बाहेर पडले. अत्यंत शांत स्वभाव असलेल्या 60 वर्षीय सिद्धू यांनी 2001 मध्ये कॉमेंट्री मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ते एक वेगळ्या अवतारात पाहायला मिळाले. त्यांच्या शेरोशायरी अनेकांना दिवाने केले. क्रिकेटमधील बारकावे ते आपल्या वेगळ्या स्टाईलने सांगायचे. त्यामुळे त्यांची फॅन फॉलोईंग जबरदस्त राहिली.

आयपीएल मध्ये एका सामन्यात समालोचन करण्यासाठी नवज्योतसिंग सिद्धूंना मिळायची इतकी मोठी रक्कम,आता पुन्हा घुमणार 'ठोको' चा आवाज...

नवज्योत सिंग सिद्धू हे इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी भाषेत समालोचन करतात. या तिन्ही भाषेवर त्यांच्या जबरदस्त प्रभुत्व आहे. मात्र स्टार स्पोर्ट्सने ते कोणत्या भाषेमध्ये समालोचन करणार आहेत, हे अद्याप निश्चित केले नाही. त्यांचा हा आवाज केवळ स्टार स्पोर्ट्स वर ऐकायला मिळणार आहे. डिजिटल राईटस जिओ सिनेमा कड आहे. तेथील कॉमेंट्री पॅनल वेगळे आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी 15 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवला. 1983 ते 1998 पर्यंत त्यांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली. त्यांनी भारतातर्फे 51 कसोटी आणि 136 वनडे सामने खेळले आहेत. ज्यात अनुक्रमे कसोटी 3203 आणि वनडे 4413 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 15 शतक आणि 48 अर्धशतके ठोकली आहेत.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *