टीम इंडियाने रचला इतिहास..एकदिवशीय क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत मोठा विजय टीम इंडियाच्या नावावर, श्रीलंकेला तब्बल एवढ्या धावांनी केले पराभूत..
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका समाप्त झाली आहे. ही मालिका खूपच रोमांचक झाली आहे. यजमान३ भारतीय संघाने ही मालिका ३-० ने जिंकली. त्याचवेळी पहिल्या वनडे सामन्याप्रमाणेच तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ अप्रतिम कामगिरी करताना दिसला.
मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम स्टेडियमवर खेळला गेला, जिथे रोहित शर्मा आणि कंपनीने धमाकेदार कामगिरी करत 317 धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात पाहुण्या संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही लोकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी झाले.
Virat Kohli 🏏 Player of the Match & Player of the Series#INDvSL | #ViratKohli𓃵 pic.twitter.com/3ToRBIYKI5
— Doordarshan Sports (@ddsportschannel) January 15, 2023
या विजयासह भारतीय संघाने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकदिवशीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वांत मोठा विजय हा भारतीय संघाच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम न्यूझीलंडसंघाच्या नावावर होता. न्यूझीलंडने आयर्लंडवर तब्बल 290 धावांनी विजय मिळवला होता. मात्र टीम इंडियाने आज श्रीलंकेला 317 धावांनी पराभूत करून त्यांचा हा विक्रम मोडून एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारती आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवशीय सामन्याचे थोडक्यात सारांश..
-
विराट-गिल जोडीने दिवसभरात श्रीलंकेच्या गोलंदाजांना दाखवले तारे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. भारतीय फलंदाजांसमोर श्रीलंकेचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ दिसले. डावाची सुरुवात करताना, शुभमन गिलने शानदार खेळी खेळली आणि 116 धावा केल्या, त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले, तर रोहित शर्मा 42 धावांवर चमिका करुणारत्नेच्या गोलंदाजीवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने एका टोकाला फलंदाजी करत संघासाठी धावा केल्या आणि गिल आणि श्रेयस अय्यरसह डाव सांभाळला.

त्याने शुभमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. त्याचवेळी त्याने अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 71 चेंडूत 108 धावांची भागीदारी केली. लाहिरूने 38 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर अय्यरला बाद करून ही जोडी फोडली. मात्र, यजमानांचा डाव संपेपर्यंत विराट नाबाद राहिला. त्याने 85 चेंडूत 46 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले आणि 110 चेंडूत 13 चौकार आणि आठ षटकारांसह 166 धावा केल्या.
केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांची बॅट विशेष काही करू शकली नाही. राहुल 7 आणि सूर्या 4 धावा करून बाद झाला. याशिवाय अक्षर पटेल 2 धावा करून नाबाद माघारी परतला. श्रीलंकेकडून रजिता आणि लाहिरूने प्रत्येकी दोन गडी बाद केले. करुणारत्नेच्या नावावर एक विकेटही नोंदवली गेली. सामन्याच्या सुरुवातीपासून विकेट्स खेळणाऱ्या टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकांत ५८ धावा करताना तीन विकेट गमावल्या. विराट आणि गिलच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर रोहित शर्माच्या संघाला 5 गड्यांच्या मोबदल्यात 391 धावांचं लक्ष्य करता आलं.
-
किंग कोहली हा विक्रम मोडू शकला नाही.
तिसऱ्या सामन्यात त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुव्वा उडवली. त्याचवेळी त्याने 106 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. पण इशान किशनचा 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 धावांचा विक्रम मोडण्यात तो चुकला. कारण ईशानने 150 धावा करण्यासाठी 103 चेंडूंचा वापर केला. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा सचिनचा विक्रम मोडण्यापासून किंग कोहली अजूनही तीन पावले मागे आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सचिनच्या नावावर 49 शतके आहेत.
-
पत्यासारखा कोसळला श्रीलंकेचा संघ:
391 धावांचे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचे फलंदाज एकामागे एक बाद होत गेले. श्रीलंकेची फलंदाजी एवढी सुमार होती की, त्यांचे 7 फलंदाज दुहेरी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. त्यांच्या याच ससुमार कामगिरीमुळे श्रीलंकेला तब्बल 317 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरी जावे लागले. भारताकडून गोलंदाज मोहम्मद सिराजने 4 गडी बाद केले तर,मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव आणि प्रत्येकी 2 गडी बाद केले.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…