एकेकाळी ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करणारा ‘हा’ गोलंदाज ठरला नेदरलँडच्या विजयाचा हिरो,वाचा क्रिकेटर होण्याची कहाणी..

 Paul van Meekeren Life Story: आयसीसीने कसोटी क्रिकेटचा दर्जा केवळ दहाच संघांना दिली असला तरीही क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीमंत देशात खेळल्या जाणाऱ्या या क्रिकेट खेळापासून प्रेरणा घेत अनेक छोट्या देशातून प्रतिभा संपन्न असलेले खेळाडू पुढे येत आहेत.

मंगळवारी झालेल्या SA vs NED सामन्यात नेदरलँड्स ने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकामध्ये आपला पहिला विजय नोंदवला आणि  त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे तो म्हणजे, गोलंदाज पॉल वान मीकेरन (Paul van Meekeren).नक्की कोण आहे हा खेळाडू आणि इथपर्यंत कसा पोहचला जाणून घेऊया अगदी सविस्तर..

पॉल वान मीकेरन (Paul van Meekeren) Life Story
एकेकाळी 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम करणारा 'हा' गोलंदाज ठरला नेदरलँडच्या विजयाचा हिरो,वाचा क्रिकेटर होण्याची कहाणी..

 

नेदरलँड संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा पॉल वान मीकेरन (Paul van Meekeren) उजव्या हाताचा गोलंदाज घरच्या परिस्थितीमुळे घरोघरी जाऊन डिलिव्हरी बॉय म्हणून फूड विकण्याचे काम करत होता. क्रिकेट संघात येण्यापूर्वी घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे तो काही दिवस डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याच्या करिअर मध्ये घरची परिस्थिती आडवी आली तरी त्याचे क्रिकेटवरील प्रेम कमी झाले नाही. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करत राष्ट्रीय संघ स्थान मिळवले.

‘हा’ गोलंदाज ठरला नेदरलँड्सच्या विजयाचा शिल्पकार

मंगळवारी नेदरलँडच्या संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवल्यामुळे हा वेगवान गोलंदाज अचानक चर्चेत आला. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने नऊ षटकात 40 धावा देत दोन महत्त्वपूर्ण गडी बाद करत नेदरलँडच्या विजयात हातभार लावला.   त्याने  एडम मारक्रम सारख्या दिग्गज फलंदाजाला अवघ्या एका धावांवर ड्रीम बॉल टाकून बोल्ड करत माघारी धाडले. याच एडम मारक्रमने श्रीलंकेविरुद्ध खेळताना सर्वात कमी चेंडू मध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. मार्को जेन्सन यालाही त्याने नऊ धावांवर त्रिफळाचित केले.

एकेकाळी 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम करणारा 'हा' गोलंदाज ठरला नेदरलँडच्या विजयाचा हिरो,वाचा क्रिकेटर होण्याची कहाणी..

2019-20 मध्ये कोविडमुळे क्रिकेट बंद होते. याच दरम्यान विश्वचषक स्पर्धा होणार होती. कोविडने जगभरात हाहाकार माजवल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. पॉल वान मीकेरन याने 15 नोव्हेंबर 2020 मध्ये एक ट्विट केले होते. त्याचे हे ट्विट आता वायरल होत आहे. त्याच्या ट्विटमध्ये हे लिहिले की आता क्रिकेट नसल्यामुळे मी सध्या डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. पॉल हा उबर इट्स मध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. आज तो विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत गुणतालिकेत आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे हा संघ गुणतालिकेत श्रीलंकेपेक्षा एक स्थान पुढे आहे.  या विजयामुळे त्यांना चांगलेच बळ मिळाले आहे. विजयानंतर कर्णधार एडवर्ड्स ने संघातील सर्वच सहकारी खेळाडूंचे तोंड भरून कौतुक केले.