NZ vs AUS: न्यूझीलंड संघाला नुकतेच त्यांच्याच घरच्या मैदानावर टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. होय, आम्ही बोलत आहोत न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज नील वॅगनरबद्दल. ज्याने आता आपल्या 12 वर्षांच्या क्रिकेट करिअरला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. nzc.nz ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो शेवटचा सामना खेळणार आहे. गुरुवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून पहिला सामना वेलिंग्टनमध्ये तर दुसरा सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाईल. ही बातमी समोर आल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Neil Wagner Retires 💔
Wagner v Wade was one of the most memorable battles I remember watching.
Neil Wagner – a once in a generation player. Always gave his best.
Emotion. Energy. Entertainment.
When he was on 🔥, he was an absolute joy to watch. pic.twitter.com/1YOK5TYccU
— Broken Cricket Dreams Cricket Blog (@cricket_broken) February 27, 2024
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना न्यूझीलंडचा गोलंदाज वॅग्नर म्हणाला,
“ज्या गोष्टीला तुम्ही खूप काही दिले आहे आणि ज्यातून तुम्ही खूप काही मिळवले आहे त्यापासून दूर जाणे सोपे नाही, परंतु आता इतर लोकांनी पुढे येऊन या संघाला पुढे नेण्याची वेळ आली आहे. .” ब्लॅककॅप्ससाठी कसोटी क्रिकेट खेळताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे आणि एक संघ म्हणून आम्ही जे काही मिळवले आहे त्याचा मला अभिमान आहे.
वॅग्नर पुढे बोलतांना म्हणाला,
“माझ्या संपूर्ण कारकिर्दीत निर्माण झालेल्या मैत्री आणि बंधांची मी कदर करेन आणि मी आज जिथे आहे तिथे मला पोहोचवण्यात ज्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.” माझे सहकारी नेहमीच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि मला नेहमी संघासाठी जे सर्वोत्तम आहे ते करायचे आहे . मला आशा आहे की मी हाच वारसा सोडत आहे.
नील वॅगनरची क्रिकेट कारकीर्द
नील वॅगनरने आतापर्यंत न्यूझीलंडकडून ६४ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये वॅगनरने 260 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय नील वॅगनरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 205 सामन्यात 821 विकेट घेतल्या आहेत. वॅग्नरने 86 टी-20 सामन्यात 95 विकेट घेतल्या होत्या.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- नादच खुळा! शार्दुल ठाकुरचा विकेट्सचा सिक्स 6 बॉल 6 बाद करून विरुद्ध संघाचा बाजार उठवला, वाचा सविस्तर.