इकडेही मियाभाईच शेर..! जॉश हेझलवूडला मागे सोडत मोहम्मद सिराज ठरला ‘या’ बाबतीत जगातील नंबर 1 गोलंदाज, बीसीसीआयनेही केले अभिनंदन..

आशिया कप नंतर पुन्हा मोहम्मद सिराजची मोठी झेप..! जॉश हेझलवूडला मागे सोडत ठरला जगातील नंबर 1 गोलंदाज, बीसीसीआयनेही केले अभिनंदन..


आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मध्ये भारतीय क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. संघाने 8व्यांदा ही ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेदरम्यान भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यांपैकी एक गोलंदाज म्हणजे मोहम्मद सिराज. सिराजने संपूर्ण आशिया कप स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करत संपूर्ण भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. सिराजच्या याच कामगिरीचा फायदा आता त्याला झाला आहे. नक्की कशामध्ये जाणून घेऊया सविस्तर..

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केली ताजी वनडे क्रमवारी

आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले.  फिरकीपटू कुलदीप यादवला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याने अप्रतिम गोलंदाजीही केली. त्याच्याशिवाय फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने फायनलमध्ये 6 विकेट्स घेत श्रीलंकेची बॅटिंग उद्ध्वस्त केली होती.

मोहम्मद सिराज- Mohmmad siraj beacme no.1 odi bowler

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये सिराजने 8 स्थानांनी झेप घेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पहिल्या क्रमांकावर होता. आता सिराजने त्यालाही मागे सोडले आहे.

आशिया कपच्या अंतिम सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट घेतल्या होत्या. यादरम्यान 29 वर्षीय खेळाडूने एकाच षटकात 4 बळी घेत खळबळ उडवून दिली. सिराजने आपल्या 7 षटकात 21 धावा देऊन 6 श्रीलंकेच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता, ज्याचा परिणाम त्याला आता आयसीसी क्रमवारीत आला आहे आणि तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

सिराजने स्पर्धेत एकूण 5 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली आणि 10 विकेट्स घेतल्या. अंतिम फेरीत गोलंदाजी करताना त्याने एक विक्रमही केला. एका षटकात ४ बळी घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. याशिवाय सिराजच्या दमदार गोलंदाजीमुळे संघाने श्रीलंकेचा संघ 15.2 षटकांत 50 धावांत ऑलआऊट केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघ्या 6.1 षटकांत 51 धावा करून सामना जिंकला. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *