IPL 2024: पंजाब किंग्जचे हे नवीन 4 युवा खेळाडू यंदा च्या वर्षी करणार भल्या भल्यांना करतील गार, वाचा सविस्तर.

Cricket 5 1

 

गेल्या 14 वर्षापासून आपल्या देशात T20 आयपीएल चे सामने खेळले जात आहेत. त्याचा फायदा हा युवा खेळाडूंना तर झालाच त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सुद्धा त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद हे मुंबई इंडियन्स या संघाने जिंकले आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे चेन्नई सुपर किंग हा संघ.

Cricket 5 1

संघाला विजेतेपद मिळण्यासाठी संघामध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही सुद्धा बाजू मजबूत लागतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या 4 खेळाडू बद्दल सांगणार आहे जे यंदा च्या सीजन ला जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून देऊ शकतात. हे खेळाडू हे किंग एलेवण पंजाब या संघामध्ये आहेत तर जाणून घेऊया सविस्तर.

प्रभसिमरन सिंह:-

किंग इलेवन पंजाब संघाचा ओपनर फलंदाज प्रभसिमरन सिंह हा आक्रमक फलंदाज आहे. मागील सीजन मध्ये प्रभसिमरन सिंह ने 14 सामन्यात 358 धावा मिळवल्या होत्या. त्यावेळी त्यांन शतक सुद्धा मारले होते. यंदा च्या वर्षी सुद्धा आक्रमक पणे फलंदाजी करतील अशी आशा आहे.

 

जितेश शर्मा:-

2023 च्या सीजन मध्ये जितेश शर्माने शानदार कामगिरी केली होती. जितेश शर्मा ने पंजाब संघासाठी उत्कृष्ट फिनिशरची भूमिका बजावली होती. अत्यंत आक्रमक पणे फलंदाजी केली होती. तसेच फॉर्म असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाने जितेश ची निवड T20 मध्ये सुद्धा केली आहे.

 

आशितोष शर्मा:-

यंदा च्या वर्षी किंग इलेवन पंजाब या संघाने या तरुण खेळाडूला ऑक्शन मध्ये खरेदी केले आहे. डोमेस्टिक क्रिकेट मध्ये आशितोष शर्मा ने अवघ्या 11 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या. अत्यंत आक्रमक फलंदाजी असल्यामुळे पंजाब संघाने या युवा खेळाडूला खरेदी केले आहे.

 

विधवत कवरप्पा :-

युवा वेगवान गोलंदाज विद्वत कावरप्पा हा देशांतर्गत क्रिकेटमधील T-20 सामन्यातील अत्यंत तज्ञ असा गोलंदाज आहे. तसेच विधवत कवरप्पा हा किफायतशीर गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

हे ही वाचा:- सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *