WPL: 31 वर्षीय खेळाडूने WPL मध्ये इतिहास रचला, हा रेकॉर्ड बनवणारी पहिली महिला फलंदाज.

Cricket 8

 

 

आपल्या देशात सध्या WPL चे सामने सुरू आहेत गेल्या 2 वर्षी पासून हे सामने सुरू झाले असेल तरी फॅन्स कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर मित्रांनो WPL मद्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल या दोन्ही संघामधील सामन्यात 31 वर्षीय महिलेनं असा कारनामा केला आहे जे भल्या भल्या खेळाडूंना जमत नाही.

Cricket 8

 

Delhi Capitals vs Mumbai Indians:-

WPL लीग चा हा 12 वा सामना दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघात झाला होता. हा सामना अरुण जेटली स्टेडियम वर झाला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि दिल्ली कॅपिटल संघाने फलंदाजी करत त्या संघातील 31 वर्षीय महिलेने रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे.

 

WPL मध्ये 31 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास:- 

दिल्ली कॅपिटल संघाची स्टार् फलंदाज मेग लैनिंग ने जबरदस्त खेळी केली आहे. मेग लैनिंग ने 38 चेंडूत 53 धावा केल्या. याच सामन्यात तिने 6 चौकार आणि 2 षटकार मारून WPL मध्ये 500 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे WPL मध्ये पहिल्या 500 धावा काढण्याचा विक्रम मेग लैनिंग ने केला.

 

WPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:-

1) मेग लैनिंग 546 रन 

2) नेट साइवर-ब्रंट 419 रन 

3) शेफाली वर्मा 408 रन 

4) एलिसा हीली 392 रन 

5) ग्रेस हैरिस 388 रन 

 

 

मेग लैनिंग ची शानदार खेळी:-

मेग लॅनिंग ही महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली होती. मेग लैनिंग ने 9 सामन्यात 345 धावा पूर्ण केल्या त्यावेळी तिने 2 अर्धशतके मारली होती. त्याचबरोबर या सिझन मध्ये मेग लॅनिंगने 5 सामन्यात 201 धावा केल्या आहेत.या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. 

 

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- ‘फिफ्टी आणि सेंच्युरी म्हणजे टाइमपास करणे’, हार्दिक पांड्याने दिली या दिग्गज खेळाडूंना खुन्नस.

 

 

हे ही वाचा:- .WPL VS IPL : नक्की काय आहे विराट कोहली आणि स्मृति मंधाना मध्ये कनेक्शन, जाणून घ्या सविस्तर.

 

हे ही वाचा:- IPL 2024: हे तीन दिग्गज खेळाडू आहेत धोनीच्या कर्णधारपदाचे चाहते, जाणून घ्या सविस्तर.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *