Cricket Newsआशिया कप 2023वर्ल्डकप 2023

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात रोहित शर्माला ट्रिपल सेंचुरी ठोकण्याची संधी ; अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय!

 

जागतिक क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध आहे. सर्वाधिक उंच उंच षटकार मारण्यात माहीर असल्यामुळे रोहितला हिटमॅन म्हटले जाते. नुकतेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. आज सुरु असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये रोहितकडे आणखीन एक विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे. ती म्हणजे एक दिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकार ठोकण्याचा विक्रम.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 297 षटकार ठोकले आहेत. त्याने आणखीन तीन षटकार ठोकल्यास षटकारांमध्ये षटकारांची ट्रिपल सेंचुरी करणारा भारताचा पहिला फलंदाज जगातला तिसरा फलंदाज ठरेल. यापूर्वी हा कारनामा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेस्टइंडीज चा विस्फोटक फलंदाज क्रिस गेल यांनी हा पराक्रम केला होता. 

World Cup[ 2023: 'विश्वचषकात टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट' वर्ल्डकपच्या एकदिवस आधी रोहित शर्माने देशाबद्दल केले मोठे वक्तव्य..

एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या नावावर आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 351 षटकार ठोकले आहेत. यासाठी त्याने 398 सामने खेळला आहे. सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीमध्ये वेस्टइंडीज चा महान फलंदाज क्रिस गेल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 301 सामन्यात 311 षटकार ठोकले आहेत.

रोहित शर्माच्या बाबतीत बोलायचे झाले तर, त्याने 253 सामन्यात 297 षटकार ठोकले आहेत. आज पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात त्याने तीन षटकार ठोकले तर सर्वात कमी सामन्यात 300 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल.

यंदाच्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माला काही खास कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तो शून्य धावसंख्येवर माघारी परतला. दुसऱ्या सामन्यात त्याने धमाकेदार कामगिरी करत अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना दमदार शतकी खेळी केली. यात त्याने 131 धावा ठोकल्या. त्याच्या या शतकी खेळाच्या जोरावर भारताने धमाकेदार विजय मिळवला.

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात रोहित शर्माला ट्रिपल सेंचुरी ठोकण्याची संधी ; अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय!

नुकतेच त्याने विश्वचषकात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम देखील केला होता. एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आत्तापर्यंत सात शतके ठोकली आहेत. विश्वचषकात यापूर्वी सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने पाच शतके ठोकली होती. आता रोहितला पुन्हा नव्या विक्रमाची संधी  आली आहे. यासाठी त्याला आणखीन तीन षटकारांची गरज आहे. रोहित शर्माचा सध्याचा परफॉर्मन्स पाहता तो या विक्रमांपासून जास्त दिवस दूर नाही असे दिसून येते. 

IND vs PAK LIVE UPDATES: रोहित शर्मा ने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे सामना सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा  निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी फलंदाजी करताना सडेतोड सुरुवात केली आहे. पाकिस्तान भारताला किती धावांचा आव्हान देते हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button