कालच्या सामन्यात धोनीने 14 धावा करून रचला नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटर ठरला.

क्रिकेट आपल्या देशाचा आवडता खेळ आहे. आपल्या देशात अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण क्रिकेट चा दिवाणा आहे. आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात परंतु क्रिकेट ला सर्वात जास्त पसंती मिळते. कालपासून आयपीएल च्या सोळाव्या सिझन ला सुरुवात झाली. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघामध्ये झाला होता.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला कालच्या आयपीएल सामन्यात धोनी ने कोणता विक्रम केला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
2023 आयपीएल चा पहिला सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर काल पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग संघाला मात देत गुजरात टायटन्स संघाने विजय मिळवला. अत्यंत आक्रमक फलंदाजी करून सुद्धा काल चेन्नई संघाला हार मिळाली.
टॉस हरल्यावर चेन्नई संघाने सुरुवातीला फलंदाजी करून 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या. मात्र असे असतानाही चेन्नई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु या सामन्यात चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ने एक विक्रम रचला आहे.
या सामन्यात 14 धावा करताच धोनीने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. धोनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आणि त्याने नाबाद 14 धावा केल्या.
धोनीने या आपल्या छोट्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. आणि 7 चेंडू मध्ये 14 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.
एवढेच नाही तर धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी षटकारांचे द्विशतक सुद्धा या सामन्यात पूर्ण केले आहे. आणि 200 षटकार मारणारा चेन्नई सुपर किंग संघातील प्रथमच खेळाडू ठरला आहे. 41 वर्ष वय असूनही धोनीमध्ये तोच जुना उत्साह आणि जोश दिसून येतो. अखेरच्या षटकात धोनीने शानदार फलंदाजी केल्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले.