आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये न्यूझीलंड संघाला विजयाचा प्रभाव दावेदार मानला जात होता. या स्पर्धेची सुरुवात त्यांनी दिमाखात सुरू केली. सलग 4 सामन्यात त्यांनी विजयी मिळवला. मात्र मागील 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सेमी फायनल मध्ये पोहोचणे अवघड झाले आहे. त्यातच या संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला केन विल्यम्सन याला दुखापत झाली होती. आता मॅट हेनरी याचा स्नायू दुखावल्याची माहिती समोर येत आहे.
न्यूझीलंड संघाने बाकी उरलेल्या 2 साखळी सामन्यांमध्ये एका नव्या गोलंदाजांना बोलावून घेतले आहे. दुखापतग्रस्त मॅट हेनरीच्या जागेवर सहा फूट सहा इंच उंचीचा वेगवान गोलंदाज न्यूझीलंडवरून बोलवण्यात आला आहे. काईल जेमिसन असे या वेगवान गोलंदाजाचे नाव आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सहावे षटक टाकत असताना मॅटला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला भर सामन्यात सामना सोडून मैदाना बाहेर जावे लागले. त्याचे उरलेले षटक टाकण्यासाठी जेम्स निशम याला बोलवण्यात आले. पुढच्या सामन्यात तो खेळणार की नाही याबाबत मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत न्यूझीलंडच्या संघाने खबरदारी म्हणून जेमिनसनला बोलावून घेतले आहे.
संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरि स्टीड यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले की, लॉकी फर्ग्युसन आणि आता मॅट हेनरी यांना पर्याय खेळाडू म्हणून जेमिसनला कॉल बॅक करण्यात आले आहे. पुढचा सामना पाकिस्तान सारख्या महत्त्वाच्या संघात विरुद्ध होणार असल्याने एक गोलंदाज कमी खेळवणे धोक्याचे होईल. मॅटने मागील सामन्यात दमदार कामगिरी केली होती. त्याचे संघात नसणे हे न्युझीलँडसाठी घातक असू शकते. आम्ही त्याच्या मेडिकल रिपोर्टची आतुरतेने वाट पाहत आहोत.
सुरुवातीच्या चार सामन्यात धडाकेबाज कामगिरी करणारा न्यूझीलंड संघ आता विजयासाठी तरसतोय.न्यूझीलंडचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांचा पुढचा महत्वपूर्ण सामना पाकिस्तान विरुद्ध बेंगलोरच्या मैदानावर 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे तर शेवटचा साखळी सामना श्रीलंके विरुद्ध नऊ नोव्हेंबर रोजी याच मैदानावर खेळला जाणार आहे. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही साखळी सामने जिंकणे अत्यंत गरजेचे आहे.