ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 25 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजेस बंगळुरू यांच्या सामना झाला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसेस यांनी आरसीबी कडून नावाची सुरुवात केली.
या सामन्यात मुंबई इंडियन्स दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने धारदार गोलंदाजी करत पाच गडी बाद केले. त्याने आपल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली याला बाद केले विराट 9 चेंडू तीन धावा काढून झेलबाद झाला. ईशान किशन कडून विकेटच्या पाठीमागे झेलबाद झाला. याप्रमाणे आयपीएलच्या इतिहासात जसप्रीत बुमराह याने विराट कोहलीला पाचव्यांदा बाद केले.
भारताचा हा दिग्गज खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे त्याने चार सामन्यात 316 धावा केल्या आहेत. आयपीएल मधील ऑरेंज कॅप सध्या त्याच्याकडे आहे. पण मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर विराट कोहली धावा काढू शकला नाही तो बुमराहचा शिकार ठरला. आयपीएलच्या इतिहासामध्ये विराट कोहली याला सर्वाधिक 7 वेळा संदीप शर्मा याने बाद केले.
गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी विराट कोहली या सहा वेळा बाद केले तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी कोहलीला आयपीएलमध्ये प्रत्येकी पाच वेळा बाद करण्यात यशस्वी ठरले.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.