भारतीय क्रिकेट संघात संधी न मिळाल्याने या खेळाडूने धरली इंग्लंडची वाट; रणजी क्रिकेटमध्ये दाखवला होता जलवा

0

प्रत्येक खेळाडूचे भारताच्या राष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळणे हे एक स्वप्न असते. मात्र प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. काही जणांना संधी मिळते तर काही जणांना संधीच सोनं न करता आल्यामुळे आल्या माघारी परत फिरावे लागते. भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट याने त्याचा शेवटचा सामना जुलै 2023 मध्ये खेळला होता. नुकतेच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

 

भारताचा हा वेगवान गोलंदाज आता या वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिप मध्ये ससेक्स संघाकडून शेवटचे पाच सामने खेळणार आहे. आयपीएल नंतर तो इंग्लंडकडे आगेकूच करणार आहे. 32 वर्षाच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने मागील वर्षी काउंटी चॅम्पियनशिप मधील चार सामन्यात 11 बळी मिळवण्यात यश मिळवले होते.

जयदेव उनादकटने मागील वर्षी लिस्टयशरविरुद्ध खेळताना दुसऱ्या डावात सहा विकेट घेऊन संघाला 15 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. अशीच कामगिरी पुन्हा करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडकडे रवाना होण्यापूर्वी जयदेव उनादकट आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद च्या संघाकडून खेळणार आहे.

 

ससेक्स चे मुख्य प्रशिक्षक फ़ारब्रेस म्हणाले की, “आमच्या संघासोबत जयदेव जोडला गेल्याने आम्हाला खूप आनंद आहे. तो एक परिपूर्ण गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामात काही रोमांचक सामने आपल्याला पहायला मिळतील. तो संघात दाखल झाल्याने आमचा संघ मजबूत बनला आहे.”

 

जयदेव उनादकटची 2010 मध्ये भारताच्या आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघात निवड झाली होती. त्यावेळी पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नसल्याने त्याला संघाबाहेर राहावे लागले. भारतीय संघाकडून त्याने आतापर्यंत चार कसोटी सामन्यात तीन बळी मिळवण्यात यश मिळाले आहे. जयदेवने त्याचा शेवटचा कसोटी सामना 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता.

तसेच भारतीय संघाकडून आठ वनडे सामन्यात नऊ विकेट घेतले होते. तर दहा टी-20 सामन्यात त्याच्या नावावर 14 विकेटची नोंद आहे. त्याने 103 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 22.58 च्या सरासरीने 382 विकेट घेतले आहेत. सौराष्ट्र ने 2019-20 मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली रणजी चषकावर आपले नाव कोरले होते.

याच वर्षे रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी 67 विकेट घेतले होते. एकाच हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज देखील ठरला. त्याच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर बंगाल विरुद्धच्या अंतिम सामन्यात तो सामनावीरचा किताब पटकावला.

जयदेव याला आयपीएलमध्ये खेळण्याचा जबरदस्त अनुभव आहे. 2010 मध्ये त्याने आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. आयपीएल मध्ये आतापर्यंत त्याने 94 सामने खेळले आहेत, ज्यात 8.85 च्या सरासरीने 91 बळी घेतले आहेत. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, रायझिंग पुणे सुपर जाइंट्स आणि लखनऊ सुपर जाइंट्स संघाकडून खेळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.