ENG vs PAK :एकामागे एक सलग 2 विकेट घेऊन पाकिस्तानी गोलंदाज ‘नौमन अली\ने मोडले इंग्लंडचे कंबरडे, जो रूटला तर पहिल्याच चेंडूवर केले बाद,व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर व्हायरल..
पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणारया तिसर्या कसोटीच्या दुसर्या दिवशी पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनीजबरदस्त गोलंदाजीचे उदाहरन सर्वांसमोर मांडले. पाकिस्तान फिरकीपटू नौमन अलीने चमकदार गोलंदाजी करताना 4 गडी बाद केले, तर तरुण गोलंदाज अब्रार अहमद यांनीही महफिलला लुटले.
अब्रारने पुन्हा एकदा त्याच्या जादुई फिरकीने चार फलंदाजांची शिकार केली. पाकिस्तानच्या स्पिनरने इंग्लंडच्या फलंदाजीचे वर्चस्व गाजवले. नौमन अलीने अशी गोलंदाजी केली की इंग्लंडच्य फलंदाजांना जास्त वेळ मैदानावर सेट होता आले नाही. त्याने सलग दोन बॉलमध्ये दोन विकेट्स घेतल्या.
TWO IN TWO! 🔥
Nauman Ali's on a roll 👌#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/lc2iC72SnN
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 18, 2022
दुसर्या दिवशी, नायमनने पहिल्या सत्रात तीन षटके दिली होती. जेव्हा तो चौथ्या षटकात आला तेव्हा बेन डाकट 26 धावा करून क्रीजवर उभा होता. नौमनने दुसर्या चेंडू टाकला आणि त्याला विकेट मिळाली. चेंडूने त्याच्या पॅडला धडक दिली. जेव्हा नौमनने जोरदार अपील केले तेव्हा पंचांनीही विलंब न करता आपले बोट उंचावले. आता पुढच्या चेंडूची पाळी होती.

पहिल्या चेंडूवर बेन डकेट बाद झाल्यानंतर रूट फलंदाजी करण्यासाठी आलाआणि त्यालाही पुढच्याच चेंडूवर नौमनने बाद केले. रूटने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या बेटच्या वरच्या कोपऱ्यावर चेंडू लागून सरळ स्लीपला उभे असलेल्या सलमानच्या हातात पडला. आणि जो रूट एकही धाव न काढता बाद झाला.
नौमन अलीने 4 घेतले विकेट.
नौमनला दोन चेंडूंमध्ये दोन विकेट्स घेऊन पाकिस्तानी खेळाडूंचा खेमा उत्साहाने भरला होता. त्यानंतर त्याने रेहान अहमद आणि बेन फॉक्सला देखील बाद केले. नौमनने रेहानला पॅव्हिलियनला 1 आणि बेन फॉक्सला 64 धावांवर चालता केले दुसर्या दिवशी नौमन, अबरार आणि मोहम्मद वसीम यांच्या चमकदार गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ दुसर्या दिवशी 354 धावांवर सर्वबाद झाला.
हेही वाचा:
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..