World cup 2023: विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा धक्कादायक पराभव, न्यूझीलंडच्या फलंदाजाची स्फोटक खेळी,केन विल्यमसनचे जबरदस्त पुनरागमन..!
ICC क्रिकेट विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) येत्या 5 तारखेपासून सुरु होणार आहे . त्याआधी क्रिकेटच्या या महाकुंभाच्या सुरुवातीला सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.सराव सामन्यातील पहिला सामना बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धचासहज जिंकला, तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा सराव सामना पावसामुळे रद्द झाला. तसेच, दिवसाच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा मोठ्या धावसंख्येने पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेले 346 धावांचे लक्ष्य किवी संघाने 44व्या षटकातच गाठले.
नन्यूझीलंड vs पाकिस्तान सामना, पहा स्कोरकार्ड..
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Aazam) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाचे सलामीवीर इमाम-उल-हक (1 धाव) आणि अब्दुल्ला शफीक (14 धावा) हे सपशेल फ्लॉप झाले. मात्र यानंतर बाबर आझम(Babar Aazam) आणि मोहम्मद रिझवान (Mohmmad Rizwan) यांच्यात ११४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. कर्णधार बाबरने 84 चेंडूत 80 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली ज्यात ,त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले, तर मोहम्मद रिझवानने 103 धावा केल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. रिझवानने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. सौद शकीलने मधल्या फळीत 75 धावांची शानदार खेळी करत संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली.
शेवटी, आगा सलमानच्या 33 धावा आणि शादाब खानच्या 16 धावांच्या जोरावर पाकिस्तानने स्कोअरबोर्डवर 345/5 अशी मोठी धावसंख्या उभारली. किवी संघाकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक 2 बळी घेतले. उच्च धावसंख्येच्या या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. डेव्हॉन कॉनवे पहिल्याच चेंडूवर हसन अलीचा बळी ठरला, मात्र त्यानंतर 6 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणाऱ्या केन विल्यमसनने (Kane Williamson) 54 धावांची खेळी केली, तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅरिल मिशेलने ५९ धावांचे योगदान दिले.
दुसऱ्या टोकाला युवा फलंदाज रचिन रवींद्रने ९७ धावा केल्याने त्याचे शतक हुकले. रवींद्रने 72 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह 97 धावांची स्फोटक खेळी खेळली. शेवटी, मार्क चॅपमनने 38 चेंडू आधी किवीजचा सामना जिंकला. चॅपमनने 41 चेंडूत 65 धावा केल्या आणि त्याला जिमी नीशमने साथ दिली ज्याने 33 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानच्या उसामा मीरने सर्वाधिक २ बळी घेतले.
हेही वाचा: