- Advertisement -

किस्सा: टेस्ट क्रिकेटचा चॅम्पियन असलेला ‘न्यूझीलंड’ संघ त्या दिवशी केवळ 26 धावांवर ऑल -आऊट झाला होता..

0 0

किस्सा: टेस्ट क्रिकेटचा चॅम्पियन असलेला न्यूझीलंड संघ त्या दिवशी केवळ 26 धावांवर ऑल -आऊट झाला होता..


क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेची वैभवशाली परंपरा आहे. असं म्हणतात, क्रिकेटमध्ये अनिश्चिततेशिवाय काहीही निश्चित नसतं. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर सिक्स मारला जाऊ शकतो, शेवटच्या विकेटसाठी ३०० रन्सची पार्टनरशीप होऊ शकते किंवा कधी एखादा विकेटकिपर आपले पॅड बाजूला ठेवून बॉल हातात घेऊ शकतो, इतकंच नाही तर हॅटट्रिकही करू शकतो.

प्रॅक्टिकली विचार केला तर यापैकी कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात घडणं कठीणच आहे. मात्र, क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासामध्ये या सर्व घटना घडलेल्या आहेत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्सपैकी टेस्ट क्रिकेटला आजही सर्वात जास्त रंजक मानलं जातं. पाच दिवसांच्या एका मॅचमध्ये कुठला बॉल, कुठली ओव्हर टर्निंग पॉईंट ठरेल, हे सांगणं महाकठीण आहे.

धावांचे उंच-उंच डोंगर उभे करण्यासाठी टेस्ट क्रिकेट प्रसिद्ध आहे. काही संघांनी तर थेट ८००च्या पारही स्कोअर नेलेले आहेत. तर काही संघ असे आहेत ज्यांना पन्नाशीदेखील पार करता आलेली नाही.

टेस्ट क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोअरचा विचार केला तर हा लाजीरवाणा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. एकदा न्यूझीलंडचा संपूर्ण कसोटी संघ अवघ्या २६ धावांवर बाद झाला होता. २८ मार्च १९५५ रोजी न्यूझीलंडच्या संघानं हा नकोसा विक्रम आपल्या नावे केला होता.

न्यूझीलंड

इंग्लंडविरुद्ध झालेल्या या टेस्ट मॅचमध्ये नेमकं काय झालं होतं, हे आपण या लेखातून जाणून घेऊया…

झीलंडला युरोपियन वसाहतकर्त्यांकडून क्रिकेटचा वारसा मिळालेला आहे. क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात जुन्या संघांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होतो. ब्लॅक कॅप्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या या संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यापासून अनेकदा मुकावं लागलं आहे. २०१५ आणि १०१९ मध्ये त्यांना दोनदा विश्वचषक फायनल गमवाव्या लागल्या.

न्यूझीलंडनं २०२१ पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून आपली पहिली-वहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली. सध्या टेस्ट क्रिकेटचा बादशाह असलेल्या न्यूझीलंडच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम आहे.

१९५५च्या मार्च महिन्यामध्ये इंग्लंडची टीम न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती. कसोटी क्रिकेटचा विचार केला तर इंग्लंडला कसोटी क्रिकेटचा सर्वात जास्त अनुभव होता. त्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ नवखाच होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड आधीच ०-१ नं पिछाडीवर होता. ड्युनेडिन येथील पहिली कसोटी त्यांनी गमावली होती. ड्युनेडिन कसोटी सामन्यात त्यांनी दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे 125 आणि 132 धावा केल्या होत्या.

alex hales
photo courtesy :Twitter

त्यानंतर दुसरी कसोटी ऑकलंडमध्ये खेळवली जाणार होती. किवी कर्णधार असलेल्या ज्योफ रॅबोननं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र, डावाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडचा संघ संकटात सापडला. फ्रँक टायसननं आपल्या अचूक गोलंदाजीच्या बळावर गॉर्डन लेगॅट आणि मॅट पोर यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यावेळी न्यूझीलंडची अवस्था २ बाद १३ अशी होती.

त्यानंतर बर्ट सटक्लिफच्या ४९ आणि जॉन रीडच्या आक्रमक धावांच्या खेळानंतर न्यूझीलंडनं ३ बाद १५४ पर्यंत मजल मारली. त्यानंतर ब्रायन स्टॅथम आणि बॉब अ‍ॅपलयार्ड या ब्रिटिश जोडीनं विकेट्स घेण्यास सुरुवात केली. कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था ८ बाद १९९ अशी होती. अ‍ॅपलयार्डनं दिवसाच्या शेवटच्या दोन चेंडूंमध्ये टोनी मॅकगिबन आणि इयान कोल्क्हॉन यांच्या विकेट घेतल्या होत्या आणि तो हॅटट्रिकवर होता.

दुसरा दिवस अ‍ॅपलयार्डच्या हॅटट्रिकनं उजाडणार असं वाटत असताना ॲलेक्स मोईरनं त्याची हॅटट्रिक टाळली. पण, त्यानंतर अवघ्या एका धावेची भर पाडून न्यूझीलंडनं शेवटच्या दोन विकेट गमावल्या. टारगेट म्हणून २०० ही धावसंख्या नक्कीच चांगली नव्हती. पण, परिस्थिती गोलंदाजांना अनुकूल होती त्यामुळं न्यूझीलंडला आशा होती.

इंग्लंडने रेग सिम्पसन आणि टॉम ग्रेव्हनीच्या विकेट लवकर गमावल्या. त्यानंतर पीटर मे आणि कॉलिन काउड्री यांनी ५६ धावांची भागीदारी करत बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. चहापानानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. विश्रांतीच्या दिवसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा, हॅरी केव्हने बेलीला दिवसाच्या सुरुवातीलाच बाद केलं. त्यानंतर इंग्लंडच्या आणखी काही विकेट झटपट गेल्या. त्यावेळी इंग्लंडची अवस्था ७ बाद १७४ धावा अशी होती.

न्यूझीलंड

न्यूझीलंडनं दिलेलं टारगेट गाठण्यासाठी त्यांना अजूनही २६ धावांची गरज होती. शेवटी इंग्लिश कर्णधारानं १४३ मिनिटांत ५३ धावा केल्या. त्याच्यानंतर आलेला अ‍ॅपलयार्ड फार काळ टिकू शकला नाही. परंतु, टायसन आणि स्टॅथम यांनी शेवटच्या विकेटसाठी २८ रन्स करून अंतिम स्कोअर २४६पर्यंत नेला.

यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या डावासाठी मैदानावर आली. त्यावेळी मैदानावर उपस्थित असलेल्या १२ हजार प्रेक्षकांना आपण एका विचित्र रेकॉर्डचे साक्षीदार होणार आहोत, याची कल्पनाही नव्हती. टायसननं पुन्हा एकदा लेगॅट आणि पोर यांना स्वस्तात बाद केलं. त्यानंतर, स्टॅथमने चहापानाच्या आधी रीडला शून्यावर क्लीन बोल्ड केलं.

त्या नंतर न्यूझीलंडची जबरदस्त पडछड सुरू झाली. त्यानंतर आणखी नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली. कारण, दोन चेंडूंनंतर अ‍ॅपलयार्डनं मॅकगिबनला पायचीत केलं आणि पुढच्याच चेंडूवर कोल्क्हौननं ग्रेव्हनीकडे झेल दिला. त्याला चार चेंडूत तीन बळी मिळाले.

१४४ मिनिटांत आणि अवघ्या २६ धावांत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ माघारी गेला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या होती. न्यूझीलंडच्या नावे असलेला हा नकोसा विक्रम आजतागायत अबाधित आहे. त्यापूर्वी एकदा दक्षिण आफ्रिकेचा संघ ३० धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यांचा हा विक्रम न्यूझीलंडनं मोडून काढला होता.

कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचंही नाव आहे. भारताचा कसोटी संघ दोनदा ५० पेक्षा कमी धावांवर बाद झालेला. १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघ ४२ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४६ वर्षे ४२ हिच भारताची निच्चांकी धावसंख्या होती. २०२० मध्ये असाच एक दिवस पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. यावेळी भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर ऑल आउट झाला होता.


“ये तो सस्ता हरभजन सिंह निकला” शुभमन गिल च्या गुगलीवर स्टेडियम मधील लोकांनी केला एकच कल्ला.   शुभमनची बॉलिंग पाहून विराट-रोहितला हसू आवरता आले नाही, VIDEO झाला व्हायरल

रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार

चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…

Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…

Leave A Reply

Your email address will not be published.