NZ vs PAK 5th T20I :  पाकिस्तानने कशीतरी वाचवली स्वतःची इज्जत, पाचव्या टी-२० मध्ये 42 धावांनी केला न्यूझीलंडचा पराभव.

NZ vs PAK 5th T20I :  पाकिस्तानने कशीतरी वाचवली स्वतःची इज्जत, पाचव्या टी-२० मध्ये 42 धावांनी केला न्यूझीलंडचा पराभव.

NZ vs PAK 5th T20I :  पाकिस्तान संघ कसा तरी न्यूझीलंड दौऱ्यावर आपला सन्मान वाचवण्यात यशस्वी झाला आहे. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा 42 धावांनी पराभव करून स्वत:ला संपवण्यापासून वाचवले. न्यूझीलंडने पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली.

पाकिस्तान संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी सलग 4 सामने गमावले होते, परंतु पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात अखेर विजयाची चव चाखली.

NZ vs PAK 5th T20I :  पाकिस्तानने आपली इज्जत कशीतरी वाचवली

क्राइस्टचर्च मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 134 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 135 धावांचे लक्ष्य ठेवले.

पाकिस्तानकडून यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 38 धावा केल्या. याशिवाय फखर जमानने ३३ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून टिम साऊदी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ईश सोधीने प्रत्येकी २ बळी घेतले.

NZ vs PAK 5th T20I :  पाकिस्तानने कशीतरी वाचवली स्वतःची इज्जत, पाचव्या टी-२० मध्ये 42 धावांनी केला न्यूझीलंडचा पराभव.

IND vs ENG:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात आजपर्यंत या 5 गोलंदाजांनी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये सर्वाधिक भारतीय सामील.

NZ vs PAK 5th T20I :  न्यूझीलंडचा संघ 92 धावांत गडगडला.

न्यूझीलंडसमोर विजयासाठी 135 धावांचे लक्ष्य होते, परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी किवीजचा डाव 17.2 षटकांत 92 धावांत गुंडाळला. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने सर्वाधिक ३ बळी घेतले. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद नवाजने 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय जमान खान आणि उसामा मीरने 1-1 विकेट घेतली.

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक २६ धावा केल्या. याशिवाय फिन ऍलनने 22 धावांची खेळी केली. अशाप्रकारे पाकिस्तानने क्लीन स्वीप करण्याचा न्यूझीलंडचा मनसुबा उधळून लावला. न्यूझीलंडने पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली.  आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने कशीबशी आपली इज्जत वाचवली.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *