NZ vs PAK LIVE: न्यूझीलंडची तुफानी फटकेबाजी.. पाकिस्तान समोर विजयासाठी 403 धावाचे लक्ष, पाकिस्तान चेस करु शकेल की घरचा रस्ता पकडणार?

NZ vs PAK LIVE: न्यूझीलंडची तुफानी फटकेबाजी.. पाकिस्तान समोर विजयासाठी 403 धावाचे लक्ष, पाकिस्तान चेस करु शकेल की घरचा रस्ता पकडणार?

NZ vs PAK LIVE:  आयसीसी विश्वचषक 2023 च्या 35 व्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 402 धावांचे लक्ष्य दिले आहे. किवी संघाने निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 401 धावा केल्या, सलामीवीर रचिन रवींद्रने 108 धावा केल्या, कर्णधार केन विल्यमसन 95 धावा करून बाद झाला, तर सलामीवीर डेव्हन कॉनवे 35, डॅरिल मिशेल 29, मार्क चॅपमनने 39 धावा केल्या.  ग्लेन फिलिप्स 41 धावा करून बाद झाला. मिचेल सँटनर २६ धावांवर तर टॉम लॅथम २ धावांवर नाबाद राहिला.

ODI World Cup 2023 NZ vs PAK: रचीन रवींद्रने विश्वचषकात रचला इतिहास,48 वर्षात कुणीही करू शकला नव्हता अशी कामगिरी..

पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने 3, हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. नाणेफेकीनंतर बोलताना पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, आम्ही मागील सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. संघात बदल करण्यात आला आहे. फिरकीपटू उसामा मीरच्या जागी वेगवान गोलंदाज हसन अलीचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला की,

आपण चांगले लक्ष्य देण्याचा प्रयत्न करू. संघात २ बदल करण्यात आले आहेत. आजचा महत्त्वाचा सामना कर्नाटक राज्यातील बेंगळुरू शहरात खेळला जात असून, तेथे दिवसभर पावसाची शक्यता आहे.

 

NZ vs PAK LIVE: न्यूझीलंडची तुफानी फटकेबाजी.. पाकिस्तान समोर विजयासाठी 403 धावाचे लक्ष, पाकिस्तान चेस करु शकेल की घरचा रस्ता पकडणार?

काल बंगळुरूमध्येही पाऊस झाला होता. आज सामन्या दरम्यान पाऊस पडल्यास दोन्ही संघांना एक तासाचा वेळ दिला जाऊ शकतो. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोघांनाही हा सामना जिंकावा लागेल. जो संघ हा सामना गमावेल त्या संघाचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.. आता पाकिस्तान हे विशाल लक्ष पार करू शकते का नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे..


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *