ODI Team of The Year 2023: हार्दिक पांड्या बाहेर, तर रोहित शर्माला इंट्री..! आयसीसीने शेअर केली स्पेशल एकदिवशीय टीम, भारतीय संघाचे 6 खेळाडू सामील..

ODI Team of The Year 2023: भारतीय क्रिकेट संघाने वर्ष 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली परंतु संघ पुन्हा एकदा ICC विजेतेपदापासून वंचित राहिला. मात्र यंदा संघाने आकडेवारीच्या बाबतीत चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने 2023 मध्ये एकूण 35 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 27 जिंकले आणि 7 गमावले. या वर्षी एक वनडे सामनाही अनिर्णित राहिला. त्यानुसार 2023 सालासाठी एक विशेष एकदिवसीय संघ निवडण्यात आला आहे ज्यामध्ये सहा भारतीय स्टार्सना स्थान मिळाले आहे.

 

 ICC ODI Team of The Year 2023 हार्दिक बाहेर, रोहित कर्णधार!

IND vs SA 3rd T20I: मालिका बरोबरीत सोडवण्याचे टीम इंडियाचे लक्ष, तिसरा टी-२० सामना आज; पावसाचं संकट कायम, पह दोन्ही संघाची प्लेईंग 11

 

हार्दिक पांड्याला भविष्यात पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी रोहित शर्माचा उत्तराधिकारी मानले जात असताना, त्याला यंदाच्या वनडे संघात स्थान मिळाले नाही. आयसीसीने  ही टीम तयार केली आहे. त्यांनी आपल्या संघात सहा भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे तर पाच इतर देशांचे खेळाडू आहेत. जसप्रीत बुमराहचे नावही या प्लेइंग 11 मध्ये नाही, तर शमी आणि सिराज यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा एकही खेळाडू या संघात नाही.

 

या प्लेइंग 11 चा भाग कोण आहे?

2023 च्या टॉप 11 वनडे संघात भारतीय संघातील सहा खेळाडूंचा समावेश आहे. या संघात रोहित शर्माशिवाय शुभमन गिल, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना स्थान मिळाले आहे. तर रोहितला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारताच्या सहा खेळाडूंशिवाय इतर पाच देशांच्या खेळाडूंचाही त्यात समावेश आहे.

आयसीसीने आपल्या संघात न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, बांगलादेशचा शाकिब अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅन्सन आणि जेराल्ड कोएत्झी यांचा समावेश केला आहे.

ODI Team of The Year 2023: हार्दिक पांड्या बाहेर, तर रोहित शर्माला इंट्री..! आयसीसीने शेअर केली स्पेशल एकदिवशीय टीम, भारतीय संघाचे 6 खेळाडू सामील..

 

  वर्ष 2023 चा सर्वांत भारी एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल, विराट कोहली, डॅरिल मिशेल, मोहम्मद रिझवान, शाकिब अल हसन, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *