ODI World Cup 2023: आजपासून सुरु होतोय क्रिकेटचा महाकुंभ, मात्र त्याआधी मागच्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचा हा रोमाचांक किस्सा एकदा वाचाच..
आजपासून जगातील सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) सुरु होत आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड(ENG vs NZ) यांच्यात वर्ल्ड कप 2023 (ODI World Cup 2023) चा पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषक 2019 चा अंतिम सामनाही या दोन संघांमध्ये खेळला गेला होता. न्यूझीलंडला हरवून इंग्लंडने विजेतेपद पटकावले. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळीही न्यूझीलंडला विजय मिळवणे सोपे नसेल.
या एकदिवशीय विश्वचषकाच्या (ODI World Cup 2023) पहिल्या सामन्याला सुरवात होण्याआधी या दोघामध्ये झालेल्या मागच्या विश्वचषकातील अंतिम सामन्याबद्दल थोडीसी माहिती पुन्हा जाणून घेऊया.. नक्की या सामन्यात इंग्लंड कसा विजेता बनला होता, हे पुन्हा आठवल्याशिवाय रहाणार नाही.
विश्वचषक 2019: जेव्हा इंग्लंड एका नियमाचा वापर करून बनला विश्वविजेता..
एकदिवशीय विश्वचषक 2019 चा अंतिम सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 विकेट गमावून 241 धावा केल्या. यादरम्यान हेन्री निकोल्सने ७७ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. लॅथमने 47 धावा केल्या होत्या. यादरम्यान इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 9 षटकांत 37 धावांत 3 बळी घेतले. लियाम प्लंकेटने 10 षटकात 42 धावा देत 3 बळी घेतले. आर्चर आणि वुडलाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.
न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने 50 षटकांत सर्वबाद 241 धावा केल्या होत्या. यामुळे सामना बरोबरीत सुटला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 84 धावांची नाबाद खेळी खेळली. जोस बटलरने ५९ धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टोने 36 धावांचे योगदान दिले. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर झाली. यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 15 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही 15 धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली.

इंग्लंड-न्यूझीलंडचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली. हा सामना अतिशय रोमांचक होता. यानंतर कोणत्या संघाने अधिक चौकार मारले यावर सामन्याचा निकाल ठरला. संपूर्ण सामन्यात इंग्लंडने 26 चौकार लगावले होते. तर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी 17 चौकार मारले होते. यात सुपर ओव्हरच्या चौकाराचाही समावेश होता. त्यामुळे इंग्लंड विजेता ठरला. पण आता आयसीसीने सीमा मोजणीचा नियम रद्द केला आहे. जर हा नियम त्यावेळी न नसता तर आयीसीकडे पुन्हा दुसरी एक सुपर ओव्हर खेळवण्याशिवाय पर्याय नव्हता..
असो झाले ते नियमानुसारच पण आज पुन्हा एकदा हे दोन संघ एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेत आमने सामने येणार आहेत. तसाच रोमांचक सामना आजही प्रेक्षकांना पाहण्यास मिळावा एवढीच आशा क्रिकेट चाहत्यांना असेल.
हेही वाचा: