ODI World Cup 2023-IND vs NZ 1St Semifinal: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईत खेळवला जाणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघांमध्ये अनेक मजबूत खेळाडूंचा समावेश आहे जे एकट्याने सामन्याचा मार्ग बदलू शकतात. भारतीय संघाकडून स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित चमकदार कामगिरी करत आहेत, तर किवी संघाकडून युवा अष्टपैलू रचिन रवींद्रने फलंदाजीत आपली छाप सोडली आहे.
या लेखात आपण दोन्ही संघांच्या त्या 5 खेळाडूंबद्दल पाहणार आहोत ज्यांच्याकडे स्वतःच सामना फिरवण्याची क्षमता आहे. हे खेळाडू चालले तर समजा त्यांच्या संघाचा विजय निश्चित आहे.
ODI World Cup 2023-IND vs NZ 1St Semifinal: या 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल संपूर्ण जगाचे लक्ष.
रोहित शर्मा:
भारत आणि न्यूझीलंड (INDv vs NZ) संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भिडतील. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे हे घरचे मैदान आहे. रोहितने या मैदानावर अनेक सामने खेळले आहेत. आयपीएलमध्येही तो या मैदानावर अनेक सामने खेळतो. रोहित सध्या ज्या लयीत आहे, ते पाहता न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत तो आपल्या घरच्या मैदानावर मोठी खेळी खेळू पाहणार आहे, असे म्हणता येईल. त्याला या खेळपट्टीची चांगलीच कल्पना आहे.
सध्याच्या आयपीएलमध्ये रोहित १२१.४९ च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. या विश्वचषकात त्याने 9 डावात 1 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 503 धावा केल्या आहेत. सलग दोन विश्वचषकात ५०० हून अधिक धावा करणारा रोहित हा पहिला कर्णधार आहे. वानखेडेमध्ये रोहितची बॅट चालली तर विरोधी संघ अडचणीत येणार आहे हे समजून घ्या.
विराट कोहली:
विराट कोहलीबद्दल काय म्हणावं? किंग कोहलीने या विश्वचषकात आतापर्यंत 9 डावात 594 धावा केल्या आहेत ज्यात 2 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. या विश्वचषकात विराटची 3 शतके हुकली. त्याची बॅट खूप गाजत आहे.
कोहलीला मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे. सध्याच्या विश्वचषकात कोहली टीम इंडियामध्ये ‘ट्रबलशूटर’च्या भूमिकेत आहे. 35 वर्षांचा विराट या सामन्यात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. तो वानखेडे स्टेडियमवर विक्रमी 50 वे वनडे शतक झळकावू शकतो.
जसप्रीत बुमराह:
View this post on Instagram
या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा यॉर्कर किंग म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज ‘जसप्रीत बुमराह’वर सर्वांच्या नजरा असतील. बुमराहने 9 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी वानखेडेवर अधिक सामने खेळतो. हे त्याच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे. बुमराहने न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी केली आहे. अशा स्थितीत किवी फलंदाजांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये कसे पाठवायचे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.
रचिन रवींद्र:
युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने पदार्पणाच्या विश्वचषकात आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. रचिनने चालू विश्वचषकात ३ शतके झळकावली आहेत. या आश्वासक क्रिकेटपटूने 9 सामन्यात 565 धावा केल्या आहेत. या काळात त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रचिनने भारतीय विकेट्सवर दाखवलेल्या पद्धतीचे खूप कौतुक होत आहे. भारतीय संघाला या डावखुऱ्या फलंदाजाबाबत सावध राहावे लागणार आहे, जर तो चालला तर यजमान संघासाठी अडचणी निर्माण करूशकतात.
ट्रेंट बोल्ट:
अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट न्यूझीलंडसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. सध्याच्या विश्वचषकात हा गोलंदाज हळूहळू फॉर्ममध्ये येत आहे. या विश्वचषकात बोल्टच्या नावावर 9 सामन्यात 13 विकेट आहेत. हा डावखुरा वेगवान गोलंदाज भारतीय टॉप ऑर्डरला अडचणीत आणू शकतो. गेल्या काही काळापासून डावखुरे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना त्रास देत आहेत.
अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना अलीकडच्या काळात डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसणाऱ्या या वेगवान गोलंदाजाबाबत सावधगिरी बाळगावी लागेल.
मित्रांनो, वरील सर्व खेळाडूंवर पहिल्या सेमीफायनल सामन्यात पूर्ण जगाची नजर असेल. हे खेळाडू आपल्या कामगिरीने सामना जिंकण्याची ताकत ठेवतात.. आता पहिल्या सेमीफायनल सामन्यात कोणटा खेळाडू कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
- हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत