ODI World Cup 2023 IND vs NZ: ODI विश्वचषक 2023 ( ODI World Cup 2023) मधील भारतीय संघाचा पुढील सामना न्यूझीलंडशी ( IND vs NZ)होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला हार्दिक पांड्याच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. आता हार्दिकच्या जागी संघात कोणत्या खेळाडूचा समावेश करायचा हे कर्णधार रोहित शर्मासमोर मोठे आव्हान असेल. याबाबत अनेक दिग्गजांनी आपली मतेही मांडली आहेत.

रोहित शर्माने आता प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करायला हवेत, असे बहुतांश क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. सर्वप्रथम, हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात यावा आणि दुसरे म्हणजे शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात यावा. आता आणखी एका दिग्गजाने रोहित शर्माला हार्दिकच्या बदलीबाबत सल्ला दिला आहे.
IND vs NZ सामन्याआधी आकाश चोप्राने कर्णधार रोहित शर्माला दिला मोलाचा सल्ला.
हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्ध न खेळणे म्हणजे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे निच्छित आहे. रोहित शर्मासाठी हे खूप कठीण असेल पण आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तानुसार, आकाश चोप्रा मानतो की, टीम इंडियाच्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात हार्दिक पांड्या महत्त्वाची भूमिका बजावतो, त्यामुळे त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावे. तर शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला आणावे.
IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 22 ऑक्टोबर रोजी रंगणार..
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाचा पाचवा सामना 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना धर्मशाला येथे होणार आहे. या दोन्ही संघांनी या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना आता एक अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानासाठी या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. सध्या दोन्ही संघांचे 8-8 गुण आहेत पण रनरेटनुसार न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे आणि टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.
असी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर
- .अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
- पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी