ODI World Cup 2023: ODI World Cup 2023 मधील न्यूझीलंड संघाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.आधी कर्णधार केन विल्यमसन स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता पुन्हा एकदा संघाचा स्टार खेळाडू जखमी होऊन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.कोण आहे तो खेळाडू जाणून घेऊया सविस्तर..
ODI World Cup 2023: न्यूझीलंडला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज मॅट हेन्री वर्ल्डकपमधून बाहेर ..
सलग तीन सामने गमावल्यानंतर संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मॅट हेन्री वर्ल्डकपमधून बाहेर पडणे हा ब्लॅक कॅप्ससाठी मोठा धक्का आहे. पण आता संघाने मॅट हेन्रीच्या जागी आणखी एका स्टार वेगवान गोलंदाज काइल जेमिसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
जेमिसन गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरूला पोहोचला आणि शुक्रवारी तो संघासोबत सराव करेल अशी अपेक्षा आहे. 28 वर्षीय खेळाडूच्या पाठीवर फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती आणि तो स्पर्धेच्या सुरुवातीला प्रशिक्षण कव्हर म्हणून भारताच्या संघासोबत होता.
न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले,
“आम्ही भाग्यवान आहोत की काइलच्या क्षमतेचा खेळाडू आमच्या संघाचा हिस्सा होत आहे. त्याचे कौशल्य आणि शारीरिक गुणधर्म त्याला एक उत्कृष्ट गोलंदाज बनवतात आणि स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यात तो आमच्यासोबत सराव करू शकला हा एक अतिरिक्त बोनस आहे.
“काईलला पाठीच्या दोन वेगवेगळ्या दुखापतींमधून बरे होण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे आणि मला माहित आहे की तो त्याच्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होण्यासाठी खरोखरच उत्साहित आहे.”
प्रशिक्षक मॅट हेन्रीबद्दल बोलतांना म्हणाले की,
“आम्ही हेन्रीसाठी खूप निराश झालो आहोत, मॅट हा आमच्या एकदिवसीय संघाचा बराच काळ महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही या स्पर्धेच्या शेवटी पोहोचलो तेव्हा त्याला बाहेर पडताना पाहून खूप निराशा झाली. गेल्या काही वर्षांपासून तो सातत्याने आयसीसीच्या टॉप 10 एकदिवसीय गोलंदाजांमध्ये स्थान मिळवत आहे, जो त्याच्या वर्गाचा आणि कौशल्याचा पुरावा आहे. याव्यतिरिक्त, मॅट हा एक उत्कृष्ट संघाचा माणूस आहे आणि आम्ही सर्व त्याचे व्यक्तिमत्व आणि अनुभव गमावू.
काइल जेमिसनला भारतीय खेळपट्ट्यांचा आहे तगडा अनुभव..
काइल जेमिसनला देखील भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचा खूप अनुभव आहे.आयपीएलच्या शेवटच्या सत्रात जेमीसन चेन्नई सुपर किंग्जकडून गोलंदाजी करताना दिसला होता. काईलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 9 सामने खेळले असून त्यात त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, त्याने न्यूझीलंड संघासाठी 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 14 विकेट घेतल्या आहेत. जेमिसनच्या येण्याने नक्कीच न्यूझीलंडला फायदा होऊ शकतो. आता जेमिसन पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी