ODI World cup 2023 आधी श्रीलंकेला मोठा धक्का.. संघाचा ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे बाहेर…
ODI World cup 2023: ICC एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यापूर्वी जखमी खेळाडूंना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता यामध्ये श्रीलंका संघाचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाच्या नावाचाही समावेश झाला आहे. लंका प्रीमियर लीगच्या 2023 हंगामाच्या अखेरीस दुखापतीमुळे मैदानात न उतरलेल्या हसरंगाच्या विश्वचषकात पुनरागमनाची प्रत्येकाला अपेक्षा होती. आता हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो मेगा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
एकदिवसीय विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाने अद्याप 15 सदस्यीय संघाची घोषणा केलेली नाही. संघाकडे 28 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे, त्यामुळे हसरंगाच्या जागी खेळाडू शोधणे त्यांच्यासाठी सोपे काम नाही. वानिंदू हसरंगाने संघाला मेगा स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात मोठी भूमिका बजावली होती.
भारतीय परिस्थितीत, वानिंदू हसरंगा हा श्रीलंकेच्या संघासाठी चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता तोच संघाच्या बाहेर झाल्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे. हसरंगाला आता ग्रेड-3 हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्रीलंका 26 सप्टेंबरला भारताला रवाना होऊ शकतो.
इतर खेळाडूंच्या फिटनेसवरही लक्ष..
वानिंदू हसरंगा व्यतिरिक्त श्रीलंका संघातील इतर काही प्रमुख खेळाडूही सध्या अनफिट आहेत. यामध्ये आशिया चषकादरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जखमी झालेल्या महेश तिक्षनाच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय दुष्मंथा चमेरा लाहिरू कुमाराच्या नावाचाही समावेश आहे, ज्याच्या फिटनेस अहवालावर श्रीलंका बोर्ड लक्ष ठेवून आहे.
श्रीलंकेचा संघ एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या मैदानावर खेळणार आहे. मेगा इव्हेंट सुरू होण्यापूर्वी, श्रीलंकेला 29 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि 3 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामने खेळायचे आहेत.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..