ODI world cup 2023: आजपासून सुरु होणार विश्वचषकाचे सराव सामने, पहा कधी कोणता संघ कोणाविरुद्ध खेळणार सराव सामने, संपूर्ण वेळापत्रक जाहीर..
5 ऑक्टोबर 2023 पासून खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी (ODI world cup 2023) सराव सामने खेळले जाणार आहेत, जे आजपासून (29 सप्टेंबर) सुरू होणार आहेत विश्व चषकात सहभागी होणारे जवळपास सर्वच संघ सराव सामन्यातदेखील भाग घेणार आहेत. चला तर सराव सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊया. कधी कोणता संघ कोणाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये देणार आहोत.
पहिला सराव सामना बांगलादेश आणि श्रीलंका (Ban vs Sl) यांच्यात गुवाहाटी येथे होणार आहे. पहिल्या दिवशी एकूण तीन सामने होतील. दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान ( SA vs AFG) यांच्यात तिरुअनंतपुरममध्ये तर तिसरा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAV KS NZ) यांच्यात हैदराबादमध्ये होणार आहे.
टीम इंडियाचे वार्मअप सामने शेड्युल!
सराव सामन्यात भारताचा सामना इंग्लंड आणि नेदरलँडशी होणार आहे. भारताचा पहिला सामना शनिवार इंग्लंडविरुद्ध ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यानंतर, संघाचा दुसरा सामना 3 ऑक्टोबरला तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामने सुरू होतील.

सर्व संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळतील.
विश्वचषकापूर्वी(ODI world cup 2023) सर्व 10 संघ 2-2 सराव सामने खेळणार आहेत. 29 सप्टेंबरपासून सुरू होणारे सराव सामने 3 ऑक्टोबरपर्यंत खेळवले जातील. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी 3-3 सामने होतील, उर्वरित दोन दिवस 2-2 सामने होतील. सराव सामन्यांसाठी बारसापारा क्रिकेट स्टेडियम (गुवाहाटी), ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम (तिरुवनंतपुरम) आणि राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम (हैदराबाद) या तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाने सराव सामने सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी संघात शेवटचा बदल केला आहे. स्टार फिरकीपटू आर अश्विनने (Ravichandra Ashwin) अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान मिळवले. दुखापतीने त्रस्त असलेला अक्षर वेळेत बरा होऊ शकला नाही, त्यामुळे अश्विनला भारताच्या विश्वचषक संघाचा भाग बनवण्यात आले.
विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार!
सर्व सराव सामने संपल्यानंतर 5 ऑक्टोबरपासून ((ODI world cup 2023) )विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड (Eng vs NZ) यांच्यात होणार आहे. टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे.
CC क्रिकेट विश्वचषक 2023 सराव सामने पूर्ण वेळापत्रक आणि सर्व ठिकाणे
-
29 सप्टेंबर 2023 – शुक्रवार
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
-
30 सप्टेंबर 2023 – शनिवार
भारत विरुद्ध इंग्लंड, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
-
ऑक्टोबर 2, 2023 – सोमवार
इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
-
3 ऑक्टोबर 2023 – मंगळवार
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
भारत विरुद्ध नेदरलँड्स, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
हेही वाचा: