ODI World Cup Final: भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत तर 8व्यांदा ऑस्ट्रोलीयाचा संघ पोहचला अंतिम सामन्यात, आतापर्यंत या संघांनी जिंकलाय विश्वचषक…

 

ODI World Cup Final: ऑस्ट्रेलियन संघाने विक्रमी 8व्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कांगारू संघाने सर्वाधिक म्हणजे ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. तर ती दोनदा उपविजेती ठरली आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 ही ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक फायनल खेळण्याची 8 वी वेळ असेल. दुसरीकडे, भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारत दोन वेळा चॅम्पियन आणि एकदा उपविजेता ठरला आहे. चला जाणून घेऊया आतापर्यंत कोणत्या संघांनी विश्वचषक जिंकला आहे.

ODI World Cup  Winner List: आतापर्यंत कोणत्या संघांनी एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे?

IND vs AUS FINAL: टीम इंडियाकडे 20 वर्षापूर्वीचा बदला घेण्याची संधी, ऑस्ट्रोलीयासोबत भिडणार अंतिम सामन्यात..!

 

  1. 1975 मध्ये पहिला विश्वचषक फायनल वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. यामध्ये वेस्ट इंडिज 17 धावांनी जिंकून चॅम्पियन बनला.
  2. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड १९७९ मध्ये दुसऱ्या विश्वचषकात भिडले होते. येथेही वेस्ट इंडिजने इंग्लंडला ९२ धावांनी पराभूत करून चॅम्पियन बनले.
  3. 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकून प्रथमच विजेतेपद पटकावले.
  4. 1897 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना झाला आणि ऑस्ट्रेलियाने 7 धावांनी सामना जिंकून पहिला विश्वचषक जिंकला.
  5. 1992 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना झाला आणि पाकिस्तानने इंग्लंडचा 22 धावांनी पराभव करून पहिला आणि एकमेव विश्वचषक जिंकला.
  6. 1996 मध्ये, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना झाला, ज्यामध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सने पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला.
  7. 1999 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून विजय मिळवत दुसरा विश्वचषक जिंकला.
  8. 2003 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना झाला होता. येथेही ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव करून तिसरा विश्वचषक जिंकला.
  9. 2007 मध्ये, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळला गेला ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 53 धावांनी विजय मिळवला आणि सलग तिसरे विजेतेपद जिंकले.
  10. 2011 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला होता. यामध्ये भारताने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.
  11. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला आणि ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सने सामना जिंकून विक्रमी 5व्यांदा विजेतेपद पटकावले.
  12. 2019 मध्ये, अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला आणि बरोबरीनंतर, अधिक चौकारांच्या आधारे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले.
  13. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 मध्ये अंतिम सामना होणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.

ODI World Cup Final: भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत तर 8व्यांदा ऑस्ट्रोलीयाचा संघ पोहचला अंतिम सामन्यात, आतापर्यंत या संघांनी जिंकलाय विश्वचषक...

ODI World Cup Final: ऑस्ट्रेलिया 8व्यांदा फायनलमध्ये तर भारत तिसऱ्यांदा फायनलमध्ये खेळणार

भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी भारताने 1983 आणि 2011 चा विश्वचषक जिंकला होता. तर 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ 8व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. या संघाने 5 वेळा विजेतेपद पटकावले असून दोनदा उपविजेतेपद पटकावले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोठा सामना रंगणार आहे.


हेही वाचा: