Odi Worldcup 2023: आजपासून विश्वचषक 2023 ला सुरवात, पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड एकमेकांना भिडणार, असे असू शकतात दोन्ही संघ आणि त्यांचे प्लेईंग 11
क्रिकेट चाहत्यांसाठी आज सर्वांत मोठा दिवस आहे कारण, आज विश्वचषक 2023 (icc odi worldcup 2023) सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (Eng vs Nz) यांच्यात पहिला सामना होणार आहे. हे दोन्ही संघ खूप मजबूत आहेत आणि मैदानावर एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसतात.
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देईल. न्यूझीलंडचा संघ केन विल्यमसनशिवाय मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार केन विल्यमसन उपलब्ध नसणार आहे.
बटलरसोबतच इंग्लंड संघात जो रूट, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्ससारखे दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी याआधीही अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. इंग्लंडचा संघ त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकतो. मार्क वुड आणि ख्रिस वोक्स हे उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखले जातात त्यामुळे संघाचे गोलंदाजी आक्रमण मजबूत होईल.
मालनबद्दल बोलायचे तर,न्यूझीलंडविरुद्ध त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. रुटचा वर्ल्डकप सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे.
न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू विल्यमसन प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. त्याची जागा भरणे सोपे जाणार नाही. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघात डेव्हन कॉनवे, विल यंग, ग्लेन फिलिप आणि जिमी नीशम यांचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो. संघाकडे मजबूत गोलंदाजीचे आक्रमण आहे. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि फर्ग्युसन यांनी अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. सगळ्यांच्या नजरा रचिन रवींद्रवर असतील.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी संभाव्य खेळाडू
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स/हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार, यष्टिरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सी, विकेट), ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम/रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.
हेही वाचा: