ODI WORLDCUP 2023: उद्यापासून सुरु होणार क्रिकेटचा महाकुंभ, पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड भिडणार, असी असू शकते संघाची प्लेईंग 11
आता 2023 एकदिवसीय विश्वचषक (ODI WORLDCUP 2023) सुरू होण्यासाठी केवळ 24 तास उरले आहेत. उद्यापासून म्हणजेच गुरुवार, ५ ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ सुरू होणार आहे. विश्वचषकाचा पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड (Eng vs Nz) यांच्यात होणार आहे. वर्ल्डकपच्या या सुरवातीच्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघाने आपले प्लेईंग 11कशी असेल याबद्दल माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया नक्की कसी असेल न्यूझीलंडची प्लेईंग 11
डेव्हन कॉनवेसह अष्टपैलू रचिन रवींद्र करू शकतो डावाची सुरवात.
विश्वचषकासाठी किवी संघाकडे लिव्ह यंगच्या रूपाने एक विशेषज्ञ सलामीवीर फलंदाज आहे, पण इंग्लंडविरुद्ध फिरकी अष्टपैलू रचिन रवींद्र डावाची सुरुवात करू शकतो. रचिनने पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात सलामी दिली आणि 97 धावांची तुफानी खेळी केली. इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात रचिन रचिंद्र आणि डेव्हन कॉनवे सलामी करू शकतात. यानंतर कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. याआधी अनेक रिपोर्ट्समध्ये विल्यमसन पहिला सामना खेळणार नसल्याचे सांगण्यात आले होते, परंतु विल्यमसनने दोन्ही सराव सामन्यांमध्ये फलंदाजी केली आणि आरामात दिसला. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्धही खेळू शकतो.
अशी असेल मिडल ऑर्डर.
मधल्या फळीबद्दल बोलायचे तर, डॅरिल मिशेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, यष्टिरक्षक टॉम लॅथम पाचव्या क्रमांकावर आणि मार्क चॅपमन सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी चॅपमन आणि ग्लेन फिलिप्स यांच्यात लढत आहे. किवी कर्णधार अंतिम अकरामध्ये कोणाचा समावेश करतो हे पाहणे रंजक ठरेल.
गोलंदाजी विभाग असा असू शकतो
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, ईश सोधी आणि मिचेल सैंटवर हे प्रमुख फिरकीपटू असू शकतात. या दोघांना सपोर्ट करण्यासाठी रचिन रवींद्रही उपस्थित आहे. अशा स्थितीत किवी संघासमोर तीन फिरकीपटूंचा पर्याय असेल. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ट्रेंट बोल्ड आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या खांद्यावर असेल.

इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (NZ Probable Playing 11 vs ENG)
रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन.
हेही वाचा: