ODI World cup 2023: मोठी बातमी..! पाकिस्तान संघाच्या वाढल्या अडचणी, वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास होतोय उशीर, मिळत नाहीये व्हिसा..
ODI World cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. यावेळी या मेगा स्पर्धेत यजमान भारतासह एकूण 10 संघ सहभागी होत असून यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडचे संघ भारतात आले आहेत. इतर संघांच्या आगमनाची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंना अद्याप भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात येण्यापूर्वी ,विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून दुबईत सराव करण्याची योजना आखली होती, मात्र आजपर्यंत त्यांना भारताचा व्हिसा न मिळाल्याने पाकिस्तान संघाचे मनसुबे उद्ध्वस्त झाले आहेत. पाकिस्तानचा संघ २७ सप्टेंबरला दुबईहून भारतात पोहोचण्याचा विचार करत आहे. त्याचवेळी पाकिस्तानला हैदराबादच्या मैदानावर 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे.
भारतीय व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याच्या काही वृत्तांनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी आयसीसीशीही चर्चा केली आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानी संघाला 27 सप्टेंबरपर्यंत भारत भेटीसाठी व्हिसा मिळेल. पाकिस्तानी संघाचे खेळाडू आणि कोचिंग स्टाफसह एकूण 33 लोक विश्वचषकासाठी भारतात येत आहेत. त्यात 3 राखीव खेळाडूंचाही समावेश आहे.
14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा शानदार सामना होणार.

पाकिस्तान संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबादच्या मैदानावर आपले सामने खेळणार आहे. यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. पाकिस्तान संघ ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँड संघाविरुद्ध विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तर संघ 11 नोव्हेंबरला कोलकात्याच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. दुसरीकडे, जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला, तर तो कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर आपला सामना खेळेल.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..