ODI World cup 2023: कर्णधार रोहित शर्माकडे आहे सर्वांत मोठा विक्रम मोडण्याची संधी, ‘या’ विश्वचषकामध्ये मोडू शकतो सचिनचा हा मोठा विक्रम..!
भारतात खेळला जाणारा एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यावेळी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या विश्वचषकाद्वारे सचिन तेंडुलकरला मागे टाकून भारतीय कर्णधार एक अतिशय खास विश्वचषक विक्रम आपल्या नावावर करू शकतो. ]नक्की काय आहे हा विक्रम जाणून घेऊया अगदी सविस्तर.
खरे तर या विश्वचषकात रोहित शर्मा भारताचा माजी दिग्गज ‘सचिन तेंडुलकर’ला मागे टाकून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनू शकतो.
रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 6 शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय विश्वचषकातही 6 शतके झळकावली होती. सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा हे संयुक्तपणे एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू आहेत. मात्र, या विश्वचषकात शतक झळकावून रोहित शर्मा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनू शकतो.
2019 च्या विश्वचषकात रोहितने 5 शतके झळकावली होती.
2019 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने स्पर्धेच्या 9 डावांमध्ये 5 शतके झळकावली, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम खेळी 140 धावा होती. रोहित या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता. त्याने 9 डावात 81 च्या सरासरीने 648 धावा केल्या. यावेळीही रोहित शर्माकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
रोहित शर्माची वनडे कारकीर्द आत्तापर्यंत अशीच होती.
जून 2007 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने भारतासाठी आतापर्यंत 251 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 243 डावांमध्ये त्याने 48.85 च्या सरासरीने 10112 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने तीन द्विशतकांसह 30 शतके आणि 52 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 धावा आहे.
हेही वाचा: