Viral Video: द्विशतक हुकलं.. ऑली पोप नाराज होऊन मैदानातून परततांना कर्णधार रोहित शर्माने केलं असं काम की, सर्वच जण करताहेत स्तुती, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: द्विशतक हुकलं.. ऑली पोप नाराज होऊन मैदानातून परततांना कर्णधार रोहित शर्माने केलं असं काम की, सर्वच जण करताहेत स्तुती, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

ऑली पोप : भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यातील पहिला कसोटी सामना  हैद्राबाद येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस.. या दिवशी इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपने सर्वांची मने जिंकली. त्याने आपल्या खेळीमध्ये 196 धावा काढल्या अवघ्या 4 धावांनी त्याचे द्विशतक चुकल्यामुळे तो काहीसा नाराज नक्कीच झाला असेल मात्र, त्याच्या खेळीमुळे त्याने इंग्लंडला एका चांगला धावसंखेवर नेऊन सोडले आहे. सर्वच क्रिकेट दिग्गज आता त्याच्या या खेळीचे कौतुक करत आहेत.

ऑली पोप नाराज होऊन मैदानातून परततांना कर्णधार रोहित शर्मा केलं असं कृत्य.

सर्वप्रथम त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माचे मन जिंकले आहे. भारतीय मैदानावर अश्विन, जडेजा आणि बुमराहसारख्या गोलंदाजांसमोर खंबीरपणे उभे राहणे सोपे नाही. परंतु, असे करून पोपने इंग्लंडला केवळ सन्माननीय स्थानावर आणले नाही तर भारतीय मैदानावर चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या करणारा इंग्लिश फलंदाज बनला. जेव्हा तो बाद होऊन परतत होता तेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याचे अभिनंदन करत मिठी मारली. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर थाप दिली. रोहित शर्माच्या या खेळभावनेच्या सन्मानामुळे प्रत्येक जण आता रोहितचे देखील कौतुक करत आहे.

भारताविरुद्धच्या हैदराबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात ओली पोपने २७८ चेंडूंचा सामना करत १९६ धावा केल्या. हा स्कोअर गाठण्यासाठी पोपला 2 जीवदान मिळाले. जडेजाच्या चेंडूवर अक्षर पटेलने झेल घेतल्यावर त्याला 110 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर आयुष्याची पहिली संधी मिळाली. त्यानंतर, त्याला त्याच्या वैयक्तिक 186 धावांवर जीवनाची दुसरी लीज मिळाली, जेव्हा केएल राहुलने मोहम्मद सिराजच्या चेंडूवर झेल सोडला. इंग्लंडचा शेवटचा फलंदाज म्हणून पोपची विकेट पडली. त्याला बुमराहने बोल्ड केले. आणि, अशाप्रकारे त्याचे द्विशतक अवघ्या 4 धावांनी हुकले.

मात्र, ऑली पोपने हे द्विशतक गाठले असते, तर हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठरले असते. पण, कसोटीत दुसरे द्विशतक झळकावले नसले तरी, भारताविरुद्ध सर्वात मोठी खेळी खेळणारा तो इंग्लंडकडून चौथा फलंदाज ठरला. पोपच्या 196 धावापूर्वी जो रूटने 218 धावा केल्या होत्या, माईक गॅटिंगने 207 धावा केल्या होत्या आणि ग्रॅहम फ्लॉवरने 201 धावा केल्या होत्या.

रोहित शर्मापासून वसीम जाफरपर्यंत सर्वांनी पोपचे कौतुक केले.

Viral Video: द्विशतक हुकलं.. ऑली पोप नाराज होऊन मैदानातून परततांना कर्णधार रोहित शर्माने केलं असं काम की, सर्वच जण करताहेत स्तुती, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

त्याच्या 196 धावांच्या खेळीसह, ओली पोप गेल्या दशकात भारतीय मैदानावर दुसऱ्या डावात द्विशतक झळकावणारा पहिला परदेशी फलंदाज बनला आहे.भारतीय संघाविरुद्धच्या या खेळीची स्क्रिप्ट त्याने आपल्या घरातच लिहिली. अश्विन, जडेजा, बुमराह आणि अक्षर या गोलंदाजांच्या विरोधात  अशी फलंदाजी करने सोपे काम नक्कीच नव्हते. आणि याच कारणामुळे रोहित शर्माने ओली पोपचे कौतुक केले. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर थाप दिली.

रोहितशिवाय काही दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनीही ओली पोपच्या खेळीचे कौतुक केले. भारतीय मैदानावर खेळल्या गेलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक असे त्याने त्याचे वर्णन केले.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *