क्रिकेट जरी आपल्या देशाचा आंतरराष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट प्रेमी आहेत. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशातील लोक हॉकी पेक्षा क्रिकेट ला मोठ्या प्रमाणात पसंती देताना आपल्याला दिसते.
क्रिकेट इतिहासात भारतीय संघ सर्व संघात अग्रेसर संघ म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी कधीही न मोडणारी रेकॉर्ड बनवली सुद्धा आहेत आणि तोडली सुद्धा आहेत तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी एकदिवसिय क्रिकेट सामन्यात सलग 3-3 शतके झळकावली आहेत.

झहीर अब्बास:-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकावणारा पहिला फलंदाजहा पाकिस्तानचा झहीर अब्बास होता. ज्याने 1982-83 साली झहीर ने सलग तीन शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता.
सईद अन्वर:-
पाकिस्तान संघाचा सर्वोत्तम फलंदाज सईद अन्वरचे ने 1994 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकावली होती.
हर्शेल गिब्स:-
या यादीत तिसरे नाव हे दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शेल गिब्सचे आहे. हर्शल गिब्सने 2002 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन शतके ठोकली.
एबी डिव्हिलियर्स:-
या यादीत चौथे नाव दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचे आहे. ज्याने 2010 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकावण्याची अद्भुत कामगिरी केली होती.
क्विंटन डी कॉक:-
या यादीतील पाचवे नाव दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकचे आहे, ज्याने 2013 मध्ये वनडेमध्ये सलग तीन शतके झळकावली होती.