आपल्या देशात सर्वात जास्त लोकांना क्रिकेट चे वेड आहे. भारतातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात. तसेच देशात अनेक वेगवेळ्या क्रिकेट चे सामने होत असतात असे वर्षभर चालूच असते.

क्रिकेट संघात टिकून खेळायचे असेल तर प्रत्येक क्रिकेटर चा परफॉर्मन्स हा खूप मोलाचा असतो. कारण सर्व काही परफॉर्मन्स वरच अवलंबून असते. प्रत्येक सामन्यादरम्यान खेळाडूंची निवड केली जाते.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात आगामी काळात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात कोणत्या 20 खेळाडूंची निवड केली आहे या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात लवकरच होणार असल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे. कारण BCCI ला वाटते की एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारताचा विजय व्हावा. त्यामुळे बीसीसीआई चे कोच राहुल द्रविड़ यांचा सोबत सतत रिव्यू मीटिंग होत आहेत.
बातम्यांच्या आधारे असे समजते की भारतीय संघाने 20 खेळाडूंचा एक पूल तयार केला आहे.ज्यांना विश्वचषकापूर्वी सतत संधी मिळतील आणि या खेळाडूंची चाचणी घेण्यात येईल, असा निर्णयही आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या 20 खेळाडूंमध्ये 7 खेळाडू निश्चितच वर्ल्ड कप खेळणार आहेत.
या मध्ये रोहित शर्मा शिवाय विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांची विश्वचषकासाठी निवड होणे जवळपास निश्चित आहे. याशिवाय रोहित शर्माकडे कर्णधारपद कायम राहणार आहे. तसेच हार्दिक पांड्याला भविष्यातील कर्णधार म्हणून तयार केले जाईल. असा विचार सुद्धा BCCI ने केला आहे.
आणि बाकीच्या खेळाडू बद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही कारण ज्या खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला राहील त्याच खेळाडूंना वर्ल्ड कप मध्ये खेळण्यासाठी संधी दिली जाईल. तसेच ऋषभ पंत चा अजून कोणताही निर्णय घेतला नाही ऐनवेळी ऋषभ पंत च्या जागी संजू सॅमसन ला सुद्धा संधी दिली जाऊ शकते.