या 3 खेळाडूंनी 200 पेक्षा कमी एक दिवसीय सामन्यात पूर्ण केल्या 7500 धावा, जाणून घ्या कोणत्या भारतीय खेळाडूंचा आहे समावेश
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी सर्वात जास्त चाहते हे क्रिकेट खेळाचे आहेत हे तुम्हाला माहीतच असेल लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड लोकांना आहे. क्रिकेट चे अनेक सामने अत्यंत आवडीने लोक पाहत असतात.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या फलंदाजाबद्दल सांगणार आहे ज्यांनी 200 पेक्षा ही कमी कसोटी सामन्यात 7500 धावा पूर्ण केल्या आहेत तर जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.
एकदिवसीय सामन्यात ते पण 200 पेक्षा कमी सामन्यात एवढ्या धावा बनवणे सोपे काम नाही हे तुम्हाला माहीतच असेल. एक दिवसीय क्रिकेट सामन्यात टिकून खेळणे खूप महत्वाचे असते.
1) रोहित शर्मा:-
भारतीय संघाचे आक्रमक आणि दिग्गज फलंदाज म्हणून रोहित शर्मा ला ओळखले जाते. अत्यंत आक्रमक फलंदाज असल्यामुळे अनेक चाहते या खेळाडूंचे आहेत. रोहित शर्मा हा भारताचा ओपनर खेळाडू आहे. रोहित शर्मा ने केवळ 149 सामन्यात 7500 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा च्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 236 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 48.91 च्या सरासरीने 9537 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यामध्ये त्याने 29 शतके, 3 द्विशतके आणि 34 अर्धशतके झळकावली आहेत.
2)हाशिम अमला:-
दक्षिण आफ्रिका संघाचे सलामविर फलंदाज म्हणून हाशिम आमला यांना ओळखले जाते. अमला ने एक दिवसीय सामन्यामध्ये 158 सामने खेळून 7500 धावा पूर्ण केल्या आहेत.
हाशिम आमला च्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 181 सामने खेळले आहेत आणि 49.47 च्या सरासरीने 8113 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 27 शतके आणि 39 अर्धशतके आहेत.
सचिन तेंदुलकर:-
मास्तर ब्लास्टर या नावाने सचिन तेंडुलकर ला संबोधले जाते. भारताचा स्टार खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर ला ओळखले जाते. एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर च्या नावी आहे.
सचिनच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर , त्याने 463 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 51 शतके, एक द्विशतक आणि 68 अर्धशतके केली आहेत.