या 4 खेळाडूंनी एकदिवशीय सामन्यात घेतलेत सर्वांत जास्त झेल, एकाने तर तब्बल 150हून अधिक वेळा घेतलेत फलंदाजांचे झेल..
क्रिकेट सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज यांचा खेळ हा पूर्णपणे वेगळा असतो परंतु फिल्डींग करण्यावेळी दोघांचे पण काम एकच असते ते म्हणजे फिल्डिंग करणे.

बऱ्याच वेळा चांगल्या फील्डींग प्रदर्शनामुळे अनेक खेळाडूंनी मैन ऑफ द मैच चा अवॉर्ड सुद्धा जिंकला आहे. फील्डिंग करताना अनेक चुका होताना दिसतात यामध्ये हातातील झेल सुटणे किंवा बॉल न अडणे या सारखे अनेक प्रकार घडताना आपल्याला दिसतात. 99 धावांवर आऊट झाल्यावर सगळ्यात जास्त दुखः होते.
कारण एक दिवसीय सामन्यात 100 धावा करणे सहजासहजी शक्य नाही ते तुम्हाला माहीतच असेल. तसेच एखाद्या खेळाडूने जर का झेल सोडला तर त्याचा परिणाम किती मोठा होतो ते सुद्धा तुम्हाला माहित असेलच.परंतु या लेखामध्ये आज तुम्हाला एक दिवशीय सामन्यात सर्वात जास्त कॅच पकडलेल्या खेळाडू बद्दल माहिती देणार आहोत.
सनथ जयसूर्या :-
सनथ जयसूर्या हा श्रीलंकेचा खेळाडू आहे. एक दिवशीय सामन्यात सर्वात जास्त कॅच पकडण्याचा रेकॉर्ड यांच्या नावी आहे. आतापर्यंत सनथ जयसूर्या ने 448 एकदिवसीय मॅचेस खेळले त्यामधील त्याने 228 कॅच घेतले आहेत.
रिकी पोंटिंग :-
रिकी पोंटिंग हा एक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. रिकी पोंटिंग ने आतापर्यंत 375 एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यामधील 160 कॅच पकडुन अनेक फलंदाजांना घरचा रस्ता दाखवलेला आहे.
मोहम्मद अजहरुद्दीन :-
मोहम्मद अजहरुद्दीन हा एक पूर्व भारतीय खेळाडू आहे. या यादीमध्ये याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर येते आता पर्यंत मोहम्मद अजहरुद्दीन ने आपल्या करियर मध्ये 334 वन डे सामने खेळले आणि यातून त्याने 156 कॅच घेऊन फलंदाजांना बाद केले आहे.
रॉस टेलर :-
रॉस टेलर हा न्यूजीलैंड चा क्रिकेटर आहे यांचा क्रमांक सुचीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे आतापर्यंत 233 वन डे मॅचेस खेळून 139 कॅच घेतले आहेत.