हे काम केले तरच इंग्लंडचा संघ होईल चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र

2023 विश्वचषक स्पर्धा इंग्लंडच्या संघासाठी एका वाईट स्वप्नासारखे ठरले आहे. 2019 मध्ये  वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या या संघाची कोणतीच गोष्ट मनासारखी होत नाही. सलग होणाऱ्या पराभवामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. 2023 विश्वचषक स्पर्धेत हा संपूर्ण संघ फेल गेला आहे. त्यामुळे आता या संघाला सेमी फायनलमध्ये जाण्याचे सर्व रस्ते बंद झाले आहेत. त्यांच्या या खराब कामगिरीमुळे इंग्लंडच्या संघाला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील सहभागी होणे अवघड झाले आहे.

2023 विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेमध्ये हा संघ 1 विजयासह दहाव्या क्रमांकावर आहे. पाच पैकी केवळ एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. विशेष म्हणजे नवख्या संघाकडून देखील त्यांचा पराभव झाला आहे. 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. या स्पर्धेत आयसीसी विश्वचषक गुणतालिकेतील पहिल्या आठ संघाना प्रवेश मिळतो. शेवटच्या दोन स्थानावर असणाऱ्या संघांना या स्पर्धेत प्रवेश मिळत नाही. इंग्लंडचा संघ सध्या दहाव्या स्थानावर आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याने त्यांना थेट प्रवेश मिळणार आहे. इंग्लंडच्या संघाला या स्पर्धेत सहभागी होता येत नसल्याचे बोलले जात आहे. मात्र अजूनही हा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी साठी पात्र ठरू शकतो, त्यासाठी त्यांना एक काम करावे लागेल. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे तीन सामने बाकी राहिले आहेत. हे तिन्ही सामने मोठ्या मार्जिनने इंग्लंडने जिंकले तरच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रवेश मिळू शकतो. या तिन्ही सामन्यातील विजयामुळे त्यांच्या गुणांकात फरक पडेल आणि गुणतलिकेत संघ वरती येईल.

इंग्लंडच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत पुढचे सामने ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तान संघासोबत आहेत. इंग्लंडला नेदरलँडविरुद्धचा पेपर सोपा जाईल मात्र ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन मातब्बर संघांना हरवणे एक मोठे त्यांच्यापुढे आव्हान असेल.

इंग्लंडने प्रत्येक वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सहभाग नोंदवला होता. या संघाने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा पराक्रम देखील केला होता. मात्र एकदा वेस्टइंडीज संघाकडून आणि दुसऱ्यांदा भारतीय संघाकडून त्यांना अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले. इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी मधील 24 सामन्यापैकी तेरा सामन्यात विजय मिळवला आहे. कालच्या सामन्याबाबतीत बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या धमाकेदार अर्धशतकी खेळी आणि जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने धमाकेदार विजय मिळवला. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला.