आयपीएल च्या १६ व्या हंगामात ऑरेंज कॅप ऋतुराज गायकवाड कडे तर पर्पल कॅप या खेळाडू कडे.
आयपीएल २०२३ या १६ व्या हंगामामध्ये ऑरेंज कॅप चा मान हा पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग च्या तरुण खेळाडूने म्हणजेच ऋतुराज गायकवाड ने पटकवला आहे. या हंगामातील पहिलीच मॅच मध्ये ऋतुराज ने ओपनिंग करत ऑरेंज कॅप आपल्या नावी केली आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध या पहिल्या मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग च्या ऋतुराज गायकवाड ने 92 रन्स करत ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर बसवली आहे.

जे की ऋतुराज गायकवाड या मॅच मध्ये नाबाद खेळून ९२ रन्स करून दाखवल्या आहेत. तर पर्पल कॅप हे लखनऊ जाइन्ट्स च्या पेसर मार्क वुड या खेळाडूने जिंकली आहे. पेसर मार्क वुड याने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या असल्याने त्याची नावी पर्पल कॅप रुजू आहे.
चेन्नई सुपर किंग चा ऋतुराज गायकवाड सध्या १४९ रन्स आपल्या नावी ठोकून पहिल्या क्रमांकावर आहे तर लखनऊ सुपर जयनट्स या संघाचा काईल्स मेयर्स ने त्याच्या नावी १२६ रन्स करून तो सध्या आयपीलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईच्या ऋतुराज ने आणि लखनऊ च्या काईल्स ने दोन दोन मॅच खेळल्या आहेत.
तर रन्स च्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स चे खेळाडू तिलक वर्मा आहेत ज्याने रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ८४ धावा केल्या आहेत. तर याच लिस्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे ज्याने ८२ रन्स केल्या आहेत. तर चेन्नई चा फाफ डूप्लेसी ने ७२ रन्स करून तो पाचव्या क्रमांकावर आहे.
लखनऊ सुपर जायन्ट्स चा मार्क वुड ने या हंगामात आतापर्यंत ८ विकेट्स घेतल्या आहेत तर त्यांच्या च टीम मधील रवी बिष्णोई हा दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्याने आतापर्यंत ५ विकेट्स घेतल्या आहेत.
तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल चा अनुभवी खेळदी युवजेंद्र चहल ने आतापर्यंत ४ विकेट्स काढल्या आहेत जो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग चे ऑलराऊंडर मोहिन अली ने सुद्धा चार विकेट्स काढल्या आहेत. तर किंग्ज इलेव्हन पंजाब चा अर्शदीप सिंग ने ३ विकेट्स काढून तो पाचव्या क्रमांकावर आहे.