भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सर्वात मोठे बदल हे आयपीएल मुळे घडून आले आहेत. कारण आयपीएल मुळे युवा खेळाडूंना क्रिकेट क्षेत्रात संधी मिळत गेल्या यंदा आयपीएल चा 17 वा सीजन सुरू झाला आहे. देशातील वेगवेगळे खेळाडू आयपीएल मध्ये आपले उत्कृष्ठ योगदान देत आहेत. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला आयपीएल 2024 ची ऑरेंज कॅप सध्या कोणाकडे आहे या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
प्रत्येक वर्षी आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप साधी शर्यत सुरू असते.जो फलंदाज सर्वात जास्त धावा पूर्ण करेल त्या खेळाडू ला ऑरेंज कॅप देऊन सन्मान केला जातो. परंतु यंदा च्या आयपीएल 2024 सीजन मध्ये ऑरेंज कॅपसाठीच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सकडून रियान पराग आणि संजू सॅमसन हे फलंदाज होते. परंतु या दोन्ही खेळाडूंना विराट कोहलीला मागे टाकण्यात अपयश आहे. तसे म्हंटले तर रियान परागला तशी चांगली संधी होती मात्र त्याला संधीचे सोने करता आले नाही.
ऑरेंज कॅप साठी लढत सुरू:-
आयपीएल च्या कित्येक सामान्यांपासून ऑरेंज कॅप ही विराट कोहली च्या डोक्यावर आहे. ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंची धडपड सुरू आहे. पंजाब किंग विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यादरम्यान ही संधी रियान पराग आणि संजू सॅमसन ला मिळाली असती परंतु लगेच बाद झाल्यामुळे ऑरेंज कॅप मिळवता आली नाही. संजू सॅमसन हा 14 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. या सामन्यात त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर रियान पराग 18 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्यानेही एक चौकार आणि एक षटकार मारला. विराट कोहली ने सहा सामन्यात 319 धावा पूर्ण करून अव्वल स्थान मिळवले. तर रियान पराग 284 धावांसह दुय्यम स्थानी तर संजू सॅमसन 264 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑरेंज कॅप साठी या खेळाडूंची धडपड:-
ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी फलंदाज मोठ्या प्रमाणात धडपड करत आहेत सध्या ऑरेंज ही विराट कोहली कडे आहे. या शर्यतीमध्ये शुबमन गिल,संजू सॅमसन,रियान पराग या खेळाडूंचा समावेश आहे.
पंजाब किंग्ज :- जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा
राजस्थान रॉयल्स :- संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.