कित्येक वर्ष लोटले गेले पण, इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींचे रहस्य शोधण्यात शास्त्रज्ञांनाही यश नाही आलंय…
कित्येक वर्ष लोटले गेले पण, इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींचे रहस्य शोधण्यात शास्त्रज्ञांनाही यश नाही आलंय…
हस्य आणि आपलं जग यांचं एकमेकांशी जरा जास्तच घट्ट नातं आहे असच कधीकधी वाटतं. कारण थोड़ा अभ्यास केला की लक्षात येतं, की हे संपूर्ण जगच रहस्य्याने भरलेलं आहे. काही वेळा तर अशा काही गोष्टी समोर येतात की जगच रहस्यमयी भासयला लागतं.
आता आपणच नाही का अनेक रहस्यमय ठिकाणांबद्दल वाचत असतो आणि ऐकत असतो, ज्यात जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी तिथली रहस्ये उलगडण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत नव्हे बराच काळ प्रयत्न करुन यापैकी काही रह्स्यांचे कोड़े सोडवले आहेत. परंतु काही अशी रहस्ये आहेत जी शास्त्रज्ञांसाठी नवीन प्रश्न निर्माण करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्यमय ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, ज्याचं रहस्य शास्त्रज्ञांना आजही कोड्यात टाकतय ते म्हणजे इस्टर आइसलैंड!
दक्षिण पैसिफिक समुद्रात स्थित हे बेट चिली नावाच्या देशातील एक लहानसं द्वीप आहे. हे बेट चिलीपासून सुमारे 3686 किलोमीटर अंतरावर आहे. हे 63.2 चौरस मीटरचे हे द्वीप एकेकाळी तीन सक्रिय ज्वालामुखींचे घर होते पण आज हा ज्वालामुखी सुप्त आहे ज्याला आपण निष्क्रिय म्हणु शकतो.

विशेष म्हणजे या ज्वालामुखींच्या लाव्हापासून तयार झालेल्या दगडांपासून इथल्या मूर्ती बनवल्या गेल्या आहेत. या बेटावर अनेक रहस्यमय मुर्त्या म्हणजेच शिल्प असून त्यांचे वजन सुमारे 100 टन आहे आणि ते शिल्प 30-40 फूट इतक्या उंचीचे आहेत. या मूर्ती याच ज्वालामुखीच्या पर्वताजवळ बनवल्या गेल्या आणि त्या नंतर त्यांना बेटाच्या वेगवेगळ्या भागात नेण्यात आले.
या सर्व मूर्तींमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व मूर्ती दिसायला जवळपास सारख्याच आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यावर असे दिसते की त्या सर्व एकाच साच्यात ओतून तयार केल्या गेल्या आहेत. सुमारे 7500 लोकसंख्येच्या या इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्ये सोडवण्याचा दावा मात्र शास्त्रज्ञांनी केला आहे, परंतु असेही काही प्रश्न आहेत जे शास्त्रज्ञांच्या समजण्याच्या पलीकडे आहेत.
सन 1722 मध्ये जेव्हा या बेटाचा शोध लागला, तेव्हा या बेटावर उपस्थित असलेल्या या मूर्तींनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. कारण इथली प्रत्येक मूर्ति म्हणजे डोक्याचा भाग आहे. त्यामुले प्रत्येकजण हाच विचार करत होता की या मूर्तीमध्ये शरीराच्या अवयवांपैकी फक्त डोक्याचा भाग बनवण्याचे काय कारण होते आणि ते का किंवा कशासाठी बनवले गेले? परंतु उत्खनना दरम्यान असे आढळून आले की या मूर्तींचे संपूर्ण शरीर जमिनीखाली गाडले गेले आहे.
इस्टर बेटावर राहणारे पहिले लोक रापानुई जमातीचे लोक होते. आतापर्यंत या बेटावर अशा प्रकारची सुमारे 1000 शिल्पे सापडली आहेत. विचित्र गोष्ट म्हणजे मोई नावाच्या या मूर्ती समुद्राच्या दिशेला पाठ करुन ठेवलेल्या आहेत. या मूर्तींची सरासरी लांबी सुमारे 13 फूट आणि वजन सुमारे 13-14 टन इतके आहे. यापैकी सर्वात मोठ्या मूर्तींची उंची सुमारे 32 फूट आहे आणि वजन 80 टनापर्यंत आहे. तसेच या बेटावर 100 पेक्षा जास्त अशीही शिल्पे आहेत ज्यांचे काम अपूर्ण राहिले होते.
या वजनदार मूर्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक संशोधन केले आहेत, त्यापैकी काही यशस्वी झाले आहेत, असे म्हणता येईल. पण प्रत्यक्षात या मूर्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा नेल्या जातील हा अजूनही न उलगडलेला प्रश्नच आहे. अशा जड मूर्ती बनवणाऱ्या रापानुई जमातीच्या लोकांचे काय झाले असेल? ते लोक कुठे नामशेष झाले? कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय या मूर्ती जमिनीत एवढ्या खाली कशा पुरल्या गेल्या? हे सर्व प्रश्न आजही अनुत्तरितच.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..