ODI Worldcup 2023: पाकिस्तान संघासाठी आनंदाची बातमी मात्र, इतर संघासाठी धोक्याची घंटा; दुखापतीमधून सावरत ‘हा’ पाकिस्तानी गोलंदाज वर्ल्डकप संघात दाखल..
वर्ल्डकप 2023 (ODI Worldcup 2023) 5 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. जवळपास 15 दिवस बाकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) वैद्यकीय समितीने स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफ (haris rauf)ला संघात निवडीसाठी योग्य घोषित केले आहे, जेणेकरून उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज वर्ल्ड कप (ICC ODI Worldcup 2023) मध्ये हिरव्या जर्सी संघात सामील होऊ शकेल.
पाकिस्तानी मीडियानुसार, हरिस रौफने पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजी केली, जिथे वैद्यकीय समितीने त्याच्या गोलंदाजीचा आढावा घेतला आणि त्याला राष्ट्रीय संघात निवडीसाठी तंदुरुस्त घोषित केले.
पीसीबीच्या वैद्यकीय समितीने तंदुरुस्त घोषित केल्यानंतर हरिस रौफने गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. अशा स्थितीत तो विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघाचा भाग असेल अशी बातमी आहे.
आशिया कप 2023 च्या सामन्यात हारिस रौफला फिटनेसच्या समस्येचा सामना करावा लागला होता. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या बरगडीला दुखापत झाली होती, त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळू शकला नाही.
पाकिस्तानी संघ आशिया कपमधून बाहेर पडला होता, त्यानंतर भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आणि विक्रमी आठव्यांदा विजेतेपद पटकावले आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..